जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक तर जळगावातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक तर जळगावातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 331 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

भडगावतील महिला पाॅझिटिव्ह

आज सकाळी भडगाव, जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 95 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 94 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती भडगावतील 30 वर्षीय महिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient 13 report positive