संसर्ग टाळण्यासाठी "टेलिमेडिसीन'चा वापर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

रुग्णाला तपासल्यानंतरच डॉक्‍टरांकडून उपचार केला जातो. परंतु जगभरात "कोरोना'ने थैमान घातल्याने त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला "सोशल डिस्टन्सिंग'ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचाच वापर अत्यावश्‍यक सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

जळगाव : बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. प्रत्येक जण सुरवातीला आपल्या परिसरातील फिजिशियन डॉक्‍टरकडे जाऊन उपचार घेतो. "कोरोना'मुळे डॉक्‍टरांसह रुग्णांमध्येही भीती निर्माण झाली असून, संसर्ग टाळण्यासाठी शहरातील डॉक्‍टर "टेलिमेडिसीन'चा वापर करीत आहे. 

हेपण वाचा - ...तर जिल्ह्यात औषध टंचाईचे सावट !

रुग्णाला तपासल्यानंतरच डॉक्‍टरांकडून उपचार केला जातो. परंतु जगभरात "कोरोना'ने थैमान घातल्याने त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला "सोशल डिस्टन्सिंग'ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचाच वापर अत्यावश्‍यक सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तसेच रुग्णालयांमध्ये होणारी गर्दीही आता बहुतांश कमी झाली आहे. याचे कारण म्हणजेच डॉक्‍टरांकडून रुग्ण तपासणीसाठी "सोशल डिस्टन्सिंग'चा वापर केला जात आहे. तसेच अत्यावश्‍यक असल्यास त्या रुग्णाची काळजी घेऊन तपासणी केली जात आहे. तसेच बहुतांश रुग्णांना फोनवरूनच मार्गदर्शन करत त्यांच्यावर औषधोपचार करीत असल्याने गल्लीतील डॉक्‍टरही सामाजिक बांधिलकी जोपासून "कोरोना'वर मात करीत आहेत. 

बहुतांश रुग्ण फोनवरून अटेंड 
रुग्णालयात येण्यापूर्वी रुग्णाने आधी फोन करणे आवश्‍यक आहे. तसे केल्यास रुग्णाची तपासणी न करताही त्याच्यावर उपचार करता येत आहेत. त्यामुळे इतर आजारांचा संसर्ग कमी होण्याचा धोका कमी आहे. तसेच दिवसभरात बहुतांश रुग्णांना फोनवरून अटेंड करून त्यांच्यावर उपचार करीत असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. 

"सोशल डिस्टन्सिंग'ची अंमलबजावणी 
रुग्णावर उपचार करून त्याला बरे करणाऱ्या डॉक्‍टरला प्रत्येक रुग्ण देव समजतो. "कोरोना'च्या भयंकर परिस्थितीतही काही डॉक्‍टर आपला जीव मुठीत घालून रुग्णांवर उपचार करीत आहेत. रुग्णावर उपचार करताना त्याच्या संपर्कात जाण्यासाठी प्रत्येक डॉक्‍टर गाऊन, हॅन्डग्लोज, मास्क, गॉगल्सचा वापर करीत आहेत. तसेच नागरिकांमध्येही आता जागृती झाली असून, त्यांच्याकडूनही "सोशल डिस्टन्सिंग'ची अंमलबजावणी केली जात आहे. 

"लॉकडाउन'च्या सुरवातीच्या काळात मुंबई, पुणे येथून आलेल्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक असल्याने त्यांना स्क्रिनिंग करून येण्याचा सल्ला दिला होता. आता बहुतांश जणांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचार करीत आहे. तसेच रुग्णालयात येण्यापूर्वी फोन करूनच येण्यास सांगत असल्याने "सोशल डिस्टन्सिंग'ची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. 
- डॉ. शेखर पाटील, जनरल फिजिशियन, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona social distnacy telimedicine