coronavirus : "कोरोना' संशयित डॉक्‍टर व्हेंटिलेटरवर... संशयितांची संख्या 13 वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

जळगाव  : संपूर्ण देशात "कोरोना व्हायरस'ने थैमान घातले असून, नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुसावळ येथील डॉक्‍टर कोल्हापूर येथून आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून त्यांना श्‍वसनाचा त्रास जाणवत होता. आज दुपारी त्यांना बेशुद्धावस्थेत जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बघताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू केले आहेत. 

संपूर्ण जगात "कोरोना'ने थैमान घातले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस "कोरोना'च्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. भुसावळ येथील तीसवर्षीय डॉक्‍टर गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथून भुसावळ येथे आले होते. दरम्यान गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्या संशयित डॉक्‍टरला श्‍वसनाचा त्रास जाणवत होता. आज हा त्रास अधिकच वाढल्याने त्यांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल करण्यात आले. डॉक्‍टरची प्रकृती पाहताच त्या संशयीत डॉक्‍टरला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवले असून, त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

संशयितांमध्ये चौघांची वाढ 
जिल्ह्यात "कोरोना'च्या संशयितांची संख्या वाढत असून, आज पुन्हा चार संशयीत जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले. यामध्ये भुसावळ येथील डॉक्‍टर कोल्हापूर येथून आला असून, दुसरे दाम्पत्य जळगावातील असून, ते इंडोनेशियातून आले. तसेच चौथा व्यक्ती दुबईहून जळगावात आला आहे. या चौघांमध्ये सर्दी, ताप यासह "कोरोना'ची लक्षणे दिसत होती. चौघा संशयितांवर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. 

संशयितांची संख्या 13 वर 
विदेशातून आलेल्यांमध्ये "कोरोना'ची लक्षणे जाणवू लागली असून, त्यांना त्याचा त्रासही होऊ लागला आहे. आतापर्यंत "कोरोना'चे 13 संशयीत जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पैकी चार संशयितांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, उर्वरित नऊ जणांचा अहवाल उद्या (20 मार्च) प्राप्त होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Corona 'on suspected doctor ventilatorNumber of suspects at 13