esakal | "त्या'... कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालकामुळे जिल्हावासीयांना टेंशन 
sakal

बोलून बातमी शोधा

truk

ट्रकचालक कांदा पोचवून माघारी निघून गेला होता. पॉझिटिव्ह ट्रकचालक जिल्ह्यात आला असल्याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली होती.

"त्या'... कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालकामुळे जिल्हावासीयांना टेंशन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव :  आंध्र प्रदेशातून कांद्याची निर्यात करण्यासाठी आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालकाच्या संपर्कात यावल तालुक्‍यातील दोन गावांतील 22 जण आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंध्रातील या ट्रकचालकाने संपूर्ण जिल्हावासीयांचे टेंशन वाढविले आहे. 

नक्की वाचा : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले फेसशिल्ड!
 

गेल्या दोन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातून कांद्याची निर्यात करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालक शुक्रवारी यावल तालुक्‍यातील दहिगाव येथे आला होता. दरम्यान, आंध्र प्रदेशातील एक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात कांदा घेऊन आला असल्याची माहिती आंध्र प्रदेशातील जिल्हाधिकारी यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी दिली. मात्र, तोपर्यंत हा ट्रकचालक कांदा पोचवून माघारी निघून गेला होता. पॉझिटिव्ह ट्रकचालक जिल्ह्यात आला असल्याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली होती. तत्काळ संपूर्ण यंत्रणेने हा ट्रकचालक कुठल्या भागात आला, त्याची माहिती गोळा केली असता. त्यानुसार ट्रकचालक यावल तालुक्‍यातील दहिगाव व सावखेडा सीम येथे आल्याचे समजताच प्रशासकीय यंत्रणेकडून या गावांत हायअलर्ट जारी करण्यात आले. 

क्‍लिक कराः"कोरोना'जनजागृतीसाठी आता राज्यात "स्वच्छताग्रही': गुलाबराव...
 

सतरा जण क्वारंटाईन 
पोलिस प्रशासनाने या ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करण्यास सुरवात केली असून, मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्या 22 जणांपैकी काही जणांना ट्रकचालकासोबत प्रवास देखील केला आहे. ट्रकचालक हा कांदा घेऊन गावात आला असता त्या ट्रकचालकाला खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 22 पैकी 17 जणांना छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात क्‍वारंटाईन करण्यात आले आहे; तर उर्वरित 5 जणांना 14 दिवस होम क्‍वारंटाईन राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचे नमुने आज तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 

गावात भीतीचे वातावरण 
यावल तालुक्‍यातील दहिगाव आणि सावखेडा येथील या प्रकाराने दोन्ही गावांतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तथापि, प्रशासनाने तातडीने पावले उचलत योग्य त्या उपाययोजना केल्या असून, ट्रकचालकाच्या संपर्कातील सर्व 22 जणांना क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता कोरोनासंबंधात योग्य ती काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेद्वारे केले जात आहे. 

आर्वजून पहा : कोरोनाच्या "सायलेंट कॅरिअर'चा धोका ओळखा! 
 

loading image
go to top