जळगाव हादरले ः त्या मृत इसमामुळे अनेकांना संसर्ग; तीस जणांचे अहवाल पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 78 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याचे कोणतेही चित्र निर्माण झालेले पाहण्यास मिळत नाही. दिवसेंदिवस रूग्ण संख्येत वाढ होत असून, आज आलेल्या अहवालांनी जिल्हा हादरला असून, तीस जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात जळगाव शहरातील तब्बल 26 जणांचा समावेश आहे. यात वाघनगरातील कोरोनाने मृत्यू झालेल्या इसमाच्या संपर्कात आलेल्या 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 78 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

शहरात नवे 26 रूग्ण 
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील सव्वीस, भुसवळ येथील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव शहरात आढळून आलेले 26 जण हे वाघनगर परिसरात कोरोना पॉझिटीव्हमुळे मयत झालेल्या इसमाच्या संपर्कातील आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 381 इतकी झाली असून आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus 30 new positive case detect