होम क्वारंटाईन व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

जिल्ह्यात अनेक जण बाहेरगावाहून आले आहेत. त्यांना क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांना तब्बल चौदा दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे आहे. मात्र काही नागरीक घरात न राहता रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत.

जळगाव : हातावर क्वारंटाईन शिक्का असलेले व्यक्तीनी घरात राहणे सक्तीचे आहे, परंतु अनेक व्यक्ती रस्त्यावर फिरतांना दिसतात. आता अशा व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कोविड सेंटर नियंत्रण अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिले आहेत. 
जिल्ह्यात अनेक जण बाहेरगावाहून आले आहेत. त्यांना क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांना तब्बल चौदा दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे आहे. मात्र काही नागरीक घरात न राहता रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांनाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जळगाव जिल्ह्यात "कोरोना'संशयीतांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे आता शासनाने कठोर निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. 
ज्या नागरिकांना "होमक्वारंटाईन'शिक्के मारले आहेत, ज्याचां चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, तरीही ते रस्त्यावर फिरत आहेत. अशा नागरिकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश इंन्सिडंन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 
जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून या कालावधीत जे बाहेर गावावरून नागरिक आपल्या जिल्ह्यात आलेले आहे त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु असे निदर्शनात आले की, काही नागरिक त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असताना सुद्धा घरी न राहता इतरत्र फिरत आहे हे अतिशय गंभीर आहे. 
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. अशा नागरिकांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. घरात न राहता बाहेर फिरतांना आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus fir home quarantine parson in road