रुग्णांसाठी राहणार मोफत ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

गंभीर स्थितीतील रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी; म्हणून मोफत ऍम्ब्युलन्स सेवा घरपोच उपलब्ध करण्यात येणार आहे.

जळगाव : कोरोना व्हारसच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून अत्यावश्‍यक रुग्ण सेवेसाठी रोटरी जळगाव ईस्ट आणि जी. एम. फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे. त्वरीत उपचार मिळण्याठी 31 मार्चपर्यंत मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजविला असून, यामुळे संपुर्ण महाराष्ट्र लॉकाडाउन करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदीचे आदेश काढले आहे. यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी; म्हणून मोफत ऍम्ब्युलन्स सेवा घरपोच उपलब्ध करण्यात येणार आहे. रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष विनोद भोईटे- पाटील यांनी याबाबत कळविले आहे. सदरची सेवा ही केवळ जळगाव जिल्ह्यातील रूग्णांसाठी गंभीर स्थितीतील रुग्णांच्या मदतीसाठी राहणार आहे. 

थेट घरापर्यंत येणार रूग्णवाहिका 
गरजूंनी रोटरी जळगाव ईस्टच्या पदाधिकारी अथवा नेमण्यात आलेल्या डॉक्‍टरांशी संपर्क साधल्यास ते डॉक्‍टर रूग्णवाहिकेसह रुग्णाच्या घरी पोहचतील. तसेच रुग्णावर घरीच उपचार करण्यासारखी स्थिती असल्यास घरीच उपचार करण्यात येतील. अथवा रुग्णांना संबंधित दवाखान्यात रूग्णवाहिकेमध्ये घेवून जाण्यात येईल. रोटरी ईस्ट व जी. एम. फाउंडेशन आणि जळगाव जिल्हा व्यवस्थापक विभाग यांचे सहकार्य लाभत आहे. 

येथे साधावा संपर्क 
गरजूंनी अध्यक्ष विनोद भोईटे-पाटील 9763376354, सचिव वीरेंद्र छाजेड, आरोग्यदूत अरविंद देशमूख (9405670387, 7058872525) (9423521944), डॉ. जगमोहन छाबडा (9823092139) यांच्याशी संपर्क साधावा. अथवा विनोद ईजिनिअंरिग स्टेडीयम कॉम्पलेक्‍स स्टेट बॅकेसमोर जळगाव (फोन- 0257 2233866) असे आवाहन आरोग्यदूत अरविंद देशमूख आणि रोटेरीयन संजय गांधी यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus sanchar bandi ambulance free avalable