विनापरवानगी बांधकाम करणाऱ्यांना चाप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

जळगाव : महापालिकेचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे आल्यावर आज त्यांनी महापालिकेत सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. यात त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहरात विनापरवानगी बांधकाम करणाऱ्यांकडून मालमत्ता कराची दुप्पट आकारणी करावी, असे आदेश दिले. तसेच प्रलंबित कामांची तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे निवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी आज महापालिकेत सायंकाळी येऊन सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त अजित मुठे, उत्कर्ष गुठे, मिनिनाथ दंडवते, मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. 

तत्काळ कामे मार्गी लावा 
प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागाचा आढावा घेतला. त्यांनी शहरातील स्वच्छता, पथदिवे, रस्त्यातील खड्डे आणि अमृत योजनेच्या कामाबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच अत्यावश्‍यक सेवा म्हणून दवाखान्याची तत्काळ दुरुस्ती करावी, औषध खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच एलईडी पथदिवे बसविण्याचा जरी मक्ता दिला असला तरी आवश्‍यक ठिकाणी पथदिवे बसविण्यासाठी तत्काळ लाइट खरेदी करावे, तसेच यंदा सादर करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकाबाबतही आढावा प्रभारी आयुक्तांनी घेतला. 

आकृतिबंधाबाबत अधिकाऱ्यांची नाराजी 
महापालिकेत काही पदे रिक्त असल्यामुळे आकृतिबंध तयार करून शासनाकडे पाठविला आहे का? अशी विचारणा प्रभारी आयुक्तांनी केली. यावर काही अधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना न विचारता आकृतिबंध तयार केला गेल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corpoaration bealding no parmition dhakne