Video उपमहापौरांकडून पोलिसांसह दोन हजार लोकांना सॅनिटायझर वाटप अन्‌ जनतेला केले आवाहन  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

गरजुंना वैद्यकीय अडीअडचण सोडवण्यासाठी डॉ.अश्‍वीन सोनवणे मित्रपरीवार सक्रिय झाले असून छोट्या-छोट्या उपचारा बाबत नागरीकांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत असल्याने त्यांना योग्यती मदतही पुरवली जात आहे.

जळगाव : महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे यांच्यातर्फे शहरातील प्रत्येक पोलिस ठाणे आणि बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. 

 

देशातील लॉकडाऊनचे तीसरे पर्व सुरु झाले असून कोरोना बाधीतांच्या संख्येतही वाढ होत आहे.जळगावात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाप्रशासनातर्फे लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यासाठी नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. गरजुंना वैद्यकीय अडीअडचण सोडवण्यासाठी डॉ.अश्‍वीन सोनवणे मित्रपरीवार सक्रिय झाले असून छोट्या-छोट्या उपचारा बाबत नागरीकांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत असल्याने त्यांना योग्यती मदतही पुरवली जात आहे. गोरगरीबांना दोनवेळच्या शिदोरीसहीत गरजु रुग्णांच्या मदतीसाठी उपमहापौर डॉ.अश्‍वीन सोनवणे यांनी आज शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वत: जावुन पोलिसांसाठी सॅनिटाझयर उपलब्ध करुन दिले.एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर कर्मचाऱ्यांना निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्याहस्ते वैय्यक्तीक आणि पोलिस ठाण्यासाठी वेगळे असे सॅनिटाझर देण्यात आले. उमहापौर डॉ.सोनवणे यांच्यासहीत मनिष भागवानी, ऍड. अमित सोनवणे, शैलेद्र सोनवणे अशांनी शहरात विवीध ठिकाणी गरजवंतांना आवश्‍यक सुविधा उलब्ध करुन देण्यासह बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आयुर्वेदीक सॅनिटायर देवुन त्याचे आभारही व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation aditinal mayer sonawane sanitijher police department