Loksabha 2019 : देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला साथ द्या : चंद्रकांत पाटील

Loksabha 2019 : देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला साथ द्या : चंद्रकांत पाटील

भडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भडगावात केले. येथे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख व कार्यकर्ते मेळाव्यात ते बोलत होते. 
ते पुढे म्हणाले की, पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा चेहरामोहरा बदलवला. विरोधक पंतप्रधानांनी संसार केला नाही ते महिलांचे दुःख काय समजतील अशी टीका करतात. पण त्यांनी धुरात स्वयंपाक करणाऱ्या महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत पाच कोटी घरात गॅस कनेक्‍शन दिले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साडेचार वर्षांत 8 लाख हेक्‍टर सिंचन क्षेत्र वाढवले. शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी दिली. अजून योजनेचा लाभ देणे सुरू असून 13 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिले. धनगर समाजाला आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी शासनाने रेंगाळल्या गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांना चालना दिल्याचे सांगितले. भडगाव शहरासाठीचा बंधाऱ्याचे काम लवकरच मार्गी लागेल असे सांगत. उन्मेष पाटील यांना मतदान करण्याचे आश्वासन दिले. यावेळी 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष अतुल पाटील, राजेंद्र पाटील, विकास पाटील, मधुकर काटे, रामकृष्ण पाटील, डॉ. विलास पाटील, सोमनाथ पाटील, अमोल पाटील, डॉ. संजीव पाटील, एस. डी. खेडकर, डॉ.अस्मिता पाटील, मनोहर चौधरी, आनंद खरात, डॉ. प्रमोद पाटील, संजय पाटील, जालिंदर चित्ते, डॉ. अर्चना पाटील, अलकाताई पाटील, इम्राण अली सय्यद, युवराज पाटील, शिंदीचे अनिल पाटील, राजेंद्र मोरे, जे. के. पाटील, संजय पाटील, सतीश शिंदे, नूतन पाटील, संजय सोनवणे, जगन भोई, प्रदीप महाजन, गुढ्याचे राजेंद्र पाटील, नीलेश पाटील, रणजित भोसले, नीलेश महाजन आदी उपस्थिती होते. प्रस्तावित अमोल पाटील यांनी केले. जे. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कुंभारे यांनी आभार मानले. 
 
बारामती व माढा ही जिंकू 
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादीकडे चार जागा होत्या आता त्यापैकी माढा व बारामती पण काढून घेऊ असे सूतोवाच केले. देशात पुन्हा भाजपचे सरकार येईल हे सर्वजण मान्य करायला लागले आहेत. एवढेच नाही शरद पवारही ते मान्य करायला लागले आहेत असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. 

यावल येथे कॉर्नर सभा 
यावल : भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ यावल येथे कार्यकर्त्यांच्या कॉर्नर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुप्त लहर असून, सर्वत्र उत्साह आहे. परीश्रमाशिवाय यश मिळणे कठीण असते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी अतिआत्मविश्वासावर विसंबून न राहता प्रत्येक घराघरांत जाऊन पक्षाचा प्रचार करावा, असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार हरिभाऊ जावळे, नगरसेवक अतुल पाटील, किशोर कुलकर्णी, आदिवासी विकास प्रकल्प समिती अध्यक्षा मीना तडवी, शिवसेनेचे जगदीश कवडीवाले, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख आदी उपस्थित होते. सरचिटणीस विलास चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. 

भुसावळला धावती भेट 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे यावल येथे सभेला जात असताना भुसावळ येथील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयात धावती भेट दिली. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंतर्गत हेवेदावे विसरून एकदिलाने काम करून निवडणुकीत विजय संपादन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. डॉ. सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रा. प्रशांत पाटील, रमेश मकासरे, सविता मकासरे, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, नमा शर्मा आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com