जिल्ह्यासाठी चिंताजनक बातमी...पून्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनावर देखील ताण वाढत आहे. स्वॅब घेतलेल्या 43 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 39 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल 
पॉझिटिव्ह आले आहे. 

क्‍लिक कराः शाहीर हरीभाऊ खैरनार यांचे निधन...एका तासात लहान बंधूचा देखील मृत्यू 
 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 59 वर्षीय पुरुष, अडावद, ता. चोपडा येथील 58 वर्षीय पुरुष, नेहरुनगर, जळगाव येथील 75 वर्षीय पुरुष तर अमळनेर येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

आर्वजून पहा :Vidio : मै सब के लिये दुवा करूगीं...और सब ठिक होगें; नंदूरबारला चार जण कोरोनामुक्त ! 
 

मुगसेची महिलेस डिच्चार्ज 
अमळनेर तालुक्‍यातील मुंगसे गावातील कोरोना बाधीत महिलाचे दोन अहवाल नुकताच निगेटीव्ह आले आहे. त्यानुसार ही महिले कोरोना मुक्त झाली असून तिला आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिच्चार्ज देण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon distric fore corona patient report positive