esakal | Video : मै सब के लिये दुवा करूगीं...और सब ठिक होगें; नंदूरबारला चार जण कोरोनामुक्त ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Video : मै सब के लिये दुवा करूगीं...और सब ठिक होगें; नंदूरबारला चार जण कोरोनामुक्त ! 

नंदुरबार : नंदुरबार शहरात आढळून आलेल्या पहिल्या रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांसह चौघे कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांचा चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी घेतलेले "स्वब निगेटिव्ह' आले आहेत. त्यामुळे या सर्वांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यातील ज्येष्ठ महिलेने मै सब के लिये दुवा करूगीं ,सब ठीक होंगे असे भावपूर्ण उद्‌गार काढत सर्वांचे आभार मानले. 

Video : मै सब के लिये दुवा करूगीं...और सब ठिक होगें; नंदूरबारला चार जण कोरोनामुक्त ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : नंदुरबार शहरात आढळून आलेल्या पहिल्या रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांसह चौघे कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांचा चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी घेतलेले "स्वब निगेटिव्ह' आले आहेत. त्यामुळे या सर्वांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यातील ज्येष्ठ महिलेने मै सब के लिये दुवा करूगीं ,सब ठीक होंगे असे भावपूर्ण उद्‌गार काढत सर्वांचे आभार मानले. 

नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज मात्र सुखद बातमी नंदूरबार करांना मिळाली आहे. नंदूरबार शहरातील वॉर्ड क्रमांक 10 मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते आज कोरोना मुक्त झाले असल्याने नंदूरबार करांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा येथील असलेली कोरोनाबांधितांची संख्या ही चितेंचीबाब नंदूरबार प्रशासनापुढे बनली आहे. 

आर्वजून पहा : असा होणार श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा
 
शहाद्यात सर्वाधिक रुग्ण 
नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे शहाद्यात असून रुग्णसंख्या 9 आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अक्कलकुवा येथे 3 तर नटावद येथे 1 अशी जिल्ह्यातील संख्या आहे. 

क्‍लिक कराः  रईसजाद्यांना मद्याची खरेदी भोवली ;29 लाखांची गाडीत 37 हजारांची दारु जप्त 
 
डॉक्‍टरांनी केली पुष्पवृष्टी 
नंदुरबारच्या एका कुटुंबातील चार जण आज कोरोना मुक्त झाले. यावेळी रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी या रुग्णांना सुट्टी देतांना त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. 

मै दुवा करूंगी... 
रुग्णालयातून घरी परत असतांना चौघांनी पैकी ज्येष्ठ महिलेने यावेळी सर्वांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ महिलेने "मै सब के लिये दुवा करुंगी', "और सब ठिक होंगे' असे भावपूर्ण उद्‌गार काढून सर्वांचे तिने आभार मानले. 
 
नक्की वाचा :  विवाहितेचा गुजरातमध्ये संशयास्पद मृत्यू- नातेवाइकांनी व्यक्त केला खुनाचा संशय 
 
loading image
go to top