तुम्ही तर नाही ना या 66 प्रतिबंधित क्षेत्रात...पहा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने, इतर सर्व कार्यालये पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरिकांना या क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरच्या व्यक्तींना या क्षेत्रात प्रवेश करणेस सक्त मनाई करण्यात आलेली आहे. 

डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक. 

जळगाव : जिल्ह्यात ज्या भागामध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र (कंटेंनमेंट झोन)म्हणून जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 66 क्षेत्र असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

आवर्जून वाचा - आजूबाजुला तीनशे "कोरोना' बाधीत रुग्ण...तरी ती धैर्याने देतेय वैद्यकीय सेवा ! 
 

जिल्ह्यात सर्वाधिक 24 प्रतिबंधित क्षेत्र जळगाव शहर महापालिका हद्दीत आहेत, जळगाव ग्रामीणमध्ये-1, अमळनेर शहरात-10, भुसावळ शहरात-13, धरणगाव शहरात-1, चोपडा तालुक्‍यात-4, पाचोरा शहरात-9, मुक्ताईनगर तालुक्‍यात-1, भडगाव तालुक्‍यात-2, यावल तालुक्‍यात-1 असे जिल्ह्यात एकूण 66 प्रतिबंधित क्षेत्रे आहे. 

शहरे, ग्रामीण भागनिहाय प्रतिबंधित क्षेत्र अशी 
- जळगाव महापालिका क्षेत्रात : मेहरुण, सालारनगर, जोशीपेठ, समतानगर, समर्थ कॉलनी, नेहरूनगर, पवननगर (सातखोल्या), अक्‍सानगर, गोपाळपुरा, खंडेरावनगर, सिंधीकॉलनी, हायवे दर्शन कॉलनी, शाहूनगर, प्रतापनगर, ओंकार नगर, गुलमोहर महाबळ, श्रीधर नगर, हरिविठ्ठल नगर, श्रीराम नगर, आदर्श नगर, गेंदालाल मिल, गांधी नगर (जिल्हा पेठ), गणेश वाडी नानीबाई हॉस्पिटल जवळ, प्रिंपाळा हुडको. 
- जळगाव ग्रामीण ः गोदावरी मेडिकल कॉलेज, बॉईज होस्टेल. 
- अमळनेर शहर व तालुक्‍यात- मुंगसे, साळीवाडा (अमळनेर), आमलेश्वर नगर, इस्लामपुरा, बोरसे गल्ली, प्रतापमील, तांबेपुरा, पैलाड, नगर पैलाड कार्यालय दूरदर्शन केंद्र, सानेनगर. 
- भुसावळ ः शहर- समता नगर, सिंधी कॉलनी, पंचशिल नगर, शांती नगर, महेश नगर, अनसुरल्हा नगर लाल बिल्डींग, भजे गल्ली जाम मोहल्ला, इदगाह खडका, इंदिरा नगर, शनिमंदिर वॉर्ड, शिवदत्त नगर, खडका गाव, मोतिराम नगर. 
- भडगाव शहर-तालुका ः निंभोरा, दत्तमढी. 
- चोपडा शहर व तालुका- अडावद, कृषिअळी भाग, मल्हारपुरा, बेलदाररअळी. 
- मुक्ताईनगर तालुका ः मन्यारखेडा. 
- पाचोरा शहर व तालुका ः देशमुखवाडी, सिंधी कॉलनी, भीम नगर, आंबेडकर नगर, अतुर्ली, गिरडरोड पाचोरा, दत्त कॉलनी, शिवकॉलनी, समर्थ अशोक नगर. 
- यावल शहर व तालुका- नवदुर्गा हौसिंग सोसायटी, फैजपूर. 
- धरणगाव तालुका ः नवेगाव तेली तलाव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district 66 contetmen zone corona virus