कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के पिक कर्ज 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

सध्या बळीराजा आपल्या शेतीची मशागत करीत आहे. पुढ बियाणे खते याकरिता शेतकऱ्याला पैसा लागणार त्यासाठी तो पिक कर्जाची वाट पाहत आहे. परंतु अजून वाटप सुरु न झाल्याने सर्वच संभ्रमावस्थेत आहेत.

वाकोद (ता. जामनेर) : महाराष्ट्र शासनाने केलेल्या शेतकरी कर्ज माफीच्या संकटातून बळीराजा अजूनही पूर्णपणे मुक्त झाला नसुन, अजून देखील त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागत आहे. कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. त्यातच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० टक्केच पिक कर्ज मिळेल, असे पत्र जिल्हा बँकेने सोसायट्यांना पूर्वीच दिलेले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

सध्या बळीराजा आपल्या शेतीची मशागत करीत आहे. पुढ बियाणे खते याकरिता शेतकऱ्याला पैसा लागणार त्यासाठी तो पिक कर्जाची वाट पाहत आहे. परंतु अजून वाटप सुरु न झाल्याने सर्वच संभ्रमावस्थेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केलेली असून, शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करुण द्यावे असे आदेश देखील दिलेले आहेत. परंतु जिल्हा बँकेकडून पीक कर्जापोटी केवळ ५० टक्केच रक्कम देण्यात येत असून, ते १०० टक्के देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. जिल्हा बँकेने २०१७ च्या कर्ज माफीच्या वेळेस हा निर्णय घेतला होता तोच निर्णय आताही लागू केलेला आहे. 
सोबतच कर्ज माफी न झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के पीक कर्ज देण्यात येणार असून, कर्ज माफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० टक्के पिक कर्ज देण्याच्या जिल्हा बँकेच्या आदेशाने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रसासनाने यात लक्ष घालून पन्नास टक्के एवजी शंबर टक्के रक्कम शेतकऱ्यांना पिक कर्जापोटी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

बँकेचे हित लक्षात घेता, गेल्या तिन वर्षापासून कर्ज माफ़ी झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्ज देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार यावेळी देखील पन्नास टक्केच कर्ज वाटप होणार आहे. पुढे जर शेतकऱ्यांनी कर्ज थकवले तर बँकेचा एनपीए वाढेल व बँकेला टाळे लावावे लागेल. 
- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर, चेअरमन, जिल्हा बँक, जळगाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district bank 50 percent farmer loan