जिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू  : न्यायमूर्ती गंगापूरवाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

जळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल, तसेच कुठे व कशी जागा आहे याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन तत्काळ मार्ग काढू, यासाठी शासनाकडे पाठपुरावाही करणार असल्याचे आश्‍वासन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी आज दिले. 

जळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल, तसेच कुठे व कशी जागा आहे याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन तत्काळ मार्ग काढू, यासाठी शासनाकडे पाठपुरावाही करणार असल्याचे आश्‍वासन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी आज दिले. 
शहरातील बी. जे. मार्केटमध्ये आज सकाळी साडेदहाला दुसऱ्या मजल्यावरील गाळ्यात फीत कापून तसेच फलक अनावरण करून न्यायमूर्ती गंगारपूरवाला व मुंबई उच्च न्यायालयाचे व औरंगाबाद खंडपीठाचे तथा पालक न्यायमूर्ती विभा कनकनवाडी यांनी कौटुंबिक न्यायालयाचे उद्‌घाटन केले, यावेळी ते बोलत होते. 
उद्‌घाटनानंतर बालगंधर्व नाट्यगृहात कार्यक्रम झाला. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश गोविंद सानप अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर न्यायाधीश चित्रा हंकारे, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष आर. आर. महाजन, जिल्हा सरकारी वकील ऍड. केतन ढाके, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलिस दलाच्या बॅण्डपथकाने वाद्य वाजवून मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर जिल्हा न्यायालयातर्फे न्या. सानप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी न्यायाधीश गोविंद सानप, न्या. चित्रा हंकारे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष आर. आर. महाजन यांनी प्रास्ताविक केले. न्यायाधीश भास्कर गोरे व न्यायाधीश आर. डी. सिदनाळे यांनी सूत्रसंचालन केले. न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून न्यायाधीशांसह वकील बांधवांची उपस्थित होती. 

संवेदनशील होऊन काम करावे : कनकनवाडी 
कुटुंब न्यायालयात काम करताना प्रत्येकाने संवेदनशील होणे गरजेचे आहे. तांत्रिक बाबींवर भर न देता संसार वाचविण्याकडे सर्वांचा कल असणे आवश्‍यक आहे. जर अशा प्रकरणात प्रकरण लांबवत ठेवले तर नात्यातील कटुता वाढून ते विकोपास जाऊ शकते. समाज संस्था, कुटुंब संस्था टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सर्व जणांनी काम करावे, त्यामुळे समाज सुदृढ होईल. ज्या देशाचा समाज सुदृढ असेल तो समाज प्रगत असेल, असे न्यायमूर्ती विभा कनकनवाडी यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district cort gangapurkar