जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे.

भुसावळ : नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 12 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 11 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. कोरोना बाधित व्यक्ती भुसावळ येथील 38 वर्षीय महिला आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 32 झाली आहे. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 11 व्यक्तींपैकी 7 व्यक्ती या भुसावळच्या असून 4 व्यक्ती या जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे. 

बाधित डॉक्टरांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह
शहरातील शांतीनगर भागातील डॉक्टरस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांच्या पत्नीसह मुलांना तपासणीसाठी मुलांना तपासणीसाठी जळगाव येथे दाखल केले होते. त्यांच्या परिवाराचा अहवाल प्राप्त झाला असून या डॉक्टरांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. त्यामुळे भुसावळ शहरातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता सातवर गेली आहे. यातील दोन रुग्णांचा अगोदरच मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district one corona pozitive