जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी "विकासों'कडून 852 ठराव प्राप्त 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातून आजपर्यंत 852 ठराव प्राप्त झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. ठराव सादर करण्याची 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. 
बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी सहकारी संस्थांसह इतर संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहे. 

हेपण पहा - एक यात्रा आटोपली...दुसऱ्या यात्रेला निघाले अन्‌ घडले भीषण! 

जिल्ह्यात 876 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या असून आत्तापर्यंत 399 ठराव प्राप्त झाले आहेत. तर इतर संस्थांमधून 453 ठराव प्राप्त झाले असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्हा बॅंकेत सध्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर ह्या अध्यक्षा आहेत. बॅंकेत सर्वपक्षीय पॅनलची सत्ता आहे. राज्यात नुकतेच सत्तांतर झाले असून महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेतही आघाडीचा पॅटर्न राबविला जातो की पुन्हा एकदा सर्वपक्षीय पॅनल होते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. 
 
राष्ट्रीयकृत बॅंकांचे 321 खाते "आधार'विना 
महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना अंमलबजावणीला अद्याप सुरवात झालेली नाही. सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित असलेल्या खात्यांची माहिती मागविण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये 321 खाती व जिल्हा बॅंकेची 65 खाती आधाराविना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही खाती आधारशी संलग्नीत करून माहिती पाठविल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district sahkari bank vikas sociaty