दिव्यांगांची मोफत शुश्रूषा करणारी आधुनिक "मदर तेरेसा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जळगाव ः व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ अपंगांची सेवा करणाऱ्या विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मदर तेरेसांची माहिती सर्वांना आहे. त्याच प्रकारची मदर तेरेसा जळगावातील मेहरुणमध्ये आहे. अपंग, दिव्यांग बालकांची सेवा करून त्यांना जीवन जगण्याचे धडे देत तब्बल 65 बालकांना जीवनप्रवाहात आणण्याचे काम येथील तुलसी दिव्यांग विकास केंद्र व सांस्कृतिक कला दालनाच्या श्‍वेता पाटील यांनी केले आहे. 

जळगाव ः व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ अपंगांची सेवा करणाऱ्या विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मदर तेरेसांची माहिती सर्वांना आहे. त्याच प्रकारची मदर तेरेसा जळगावातील मेहरुणमध्ये आहे. अपंग, दिव्यांग बालकांची सेवा करून त्यांना जीवन जगण्याचे धडे देत तब्बल 65 बालकांना जीवनप्रवाहात आणण्याचे काम येथील तुलसी दिव्यांग विकास केंद्र व सांस्कृतिक कला दालनाच्या श्‍वेता पाटील यांनी केले आहे. 
गेल्या दहा वर्षांपासून ते हा उपक्रम मोफत राबवत आहेत. अपंग, दिव्यांग बालकाची सेवा करून त्यांचे जीवन सुकर होण्यासाठी त्यांच्या विविध प्रकारच्या कला त्या जोपासण्यात यशस्वी झाल्या आहेत. लवकरच अठरा वर्षांवरील दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. 
दिव्यांगांना सांभाळणे, त्यांचे संगोपन करणे हे पालकांसाठी अतिशय जिकिरीचे काम असते. अशा बालकाचा जन्म त्यांच्यासाठी एकप्रकारे नेहमी चिंतेचा विषय असतो. या मुलांना स्वतःची शुद्ध नसते. "सी-शू'चेही भान नसते. याचे पुढे कसे होणार याची चिंता पालकांना सतावते. मात्र श्रीमती पाटील यांनी जळगाव शहरातील विविध कॉलन्या, उपनगरांत जाऊन अशा मुलांच्या पालकांना आपल्या दिव्यांग मुलांना त्यांच्या दिव्यांग विकास केंद्रात पाठविण्याची विनंती केली. त्यांची ने-आण करण्यासाठी खास वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली. सुरवातीस दिव्यांगांना सांभाळणे कठीण झाले. यामुळे त्यांनी वीस ते बावीस "केअरटेकर'ची नियुक्‍ती केली. प्रत्येक दिव्यांगाला आपलेसे करून त्याला समजेल अशा खुणा करून त्यांना अ, ब, क, ड बाराखडी, एक, दोन, तीन ही अक्षरे व इतर खेळ शिकविले. 
शिक्षण, क्रीडा, संगीत, नृत्य, संगणक तंत्रज्ञान, बुद्धी विकासाचे धडे दिले जातात. श्रीमती पाटील नृत्यशिक्षिका आहेत. त्या नृत्याचे धडेही दिव्यांगांना देतात. यामुळे दिव्यांग मुलेच या केंद्रात स्वतःहून येण्यास तयार होतात. गेल्या दहा वर्षांत 65 दिव्यांगांना रोजचा दैनंदिन व्यवहार, खेळ, कला त्यांनी शिकविली. दिव्यांग मुले अठरा वर्षांची झाल्यानंतर त्यांना केंद्रात ठेवले जात नाही. पालकांच्या स्वाधीन केले जाते. यामुळे 65 दिव्यांग मुले पालकांकडे आता सज्ञान म्हणून वावरू लागली आहेत. 
सध्या केंद्रात 115 दिव्यांग मुले-मुली आहेत. त्यांना कसे बसावे, कसे खावे, कसे प्यावे, बोलणे, खेळणे, काम करण्यास शिकविले जाते. दिव्यांगांचा खेळ, संगीतातून बृद्धी विकास घडवून आणला आहे, तोही अगदी मोफत. दिव्यांगांना आपले आयुष्य चांगल्या माणसासारखे जगता यावे, स्वतःची कामे स्वतः करता यावीत, जेणे करून ते इतरांसाठी तापदायक ठरणार नाहीत, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. 

दिव्यांगांना त्यांच्या स्तरावर जाऊन मी शिकविते. संगीत, नृत्याद्वारे मी दिव्यांगांना खेळ, नृत्य आदी गोष्टी शिकविल्या. त्यांना बुद्धी येईल असे बुद्धी विकासाचे कार्यक्रम घेतले. 112 दिव्यांग केंद्रात आहेत. त्यांची मोफत सेवा सुश्रुषा मी करते. 18 वर्षांवरील दिव्यांगांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. 
- श्‍वेता पाटील, संचालिका, तुलसी दिव्यांग विकास केंद्र, जळगाव. 

Web Title: marathi news jalgaon divyang madar teresa