दिव्यांग संकेतने रोवला लेहवर झेंडा 

प्रवीण पाटील
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास हा चक्‍क सायकलने नुकताच पार केला. लेह- लडाख येथील पर्वतावरील उंच ठिकाण गाठून तेथे आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. 

संकेत हा मूळ बामणोद (ता.यावल) येथील व सध्या मुंबई येथील रहिवासी आहे. तो जन्मतः अंध असला, तरी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार. चौथी व सातवीच्या परीक्षेत त्याला शिष्यवृत्ती मिळाली. उच्चशिक्षण घेऊन सध्या तो भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये एचआर विभागात प्रशिक्षण अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याला सायकलिंग छंद असल्याने मनाली ते लेह हा खडतर प्रवास सायकलने करायचा चंग त्याने बांधला. "ऍडव्हेंचर बियॉंड बॅरियर्स फाउंडेशन' आयोजित व भारत पेट्रोलियम कंपनीने प्रायोजित केलेल्या "एम 2 के 2018'च्या मनाली ते खारडुंगला लेह हा 550 किलोमीटर लांब व 18340 फूट उंच रस्त्यावर तो सायकल प्रवासाला निघाला आणि हा प्रवास त्याने हा अठरा दिवसांत पार केला. 

या रस्त्यावर ठिकठिकाणी अत्यंत अवघड चढाव, उतार व जीवघेणे वळणे आहेत. एवढ्या उंचीवर प्राणवायूचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे प्रवास करणे अत्यंत जिकरीचे असते. परंतु या सर्व आव्हानांना, अडचणींना तोंड देत, संकेतने आपले ध्येय गाठले. या शिवाय स्वीमिंग, नेव्ही टूर्नामेंट, राज्य व राष्ट्रीय मॅरेथॉन पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत उत्तम यश मिळविले आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान वसीम अक्रम, अभिनेत्री विजया लाड आदींचे हस्ते त्यास पुरस्कार मिळाला आहे. संकेत हा हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतील डेप्युटी जनरल मॅनेजर विजय भिरूड यांचा मुलगा, तर धनाजी नाना महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य एस. एम. भिरूड यांचा नातू आहे. 
.

माझा आत्मविश्‍वास जिंकला 
मला दृष्टी नसली, तरी त्याचा कमीपणा किंवा शल्य मला कधी वाटले नाही. कारण, यश हे शारीरिक बळाने नव्हे तर इच्छाशक्तीच्या बळाने मिळते. जिद्द असेल तर अपंग व्यक्तीही अशक्‍य वाटणारी कर्तबगारी करू शकतात. मी पूर्ण केलेला प्रवास तसा खूपच कठीण होता. पण आता मागे सरायचे नाही आणि पुढेच चालायचे हा चंग मनाशी बांधला होता. अखेर माझा आत्मविश्‍वास जिंकलाच, अशी भावना संकेत भिरूड यांनी व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon divyang saket leh