बोहरा समाजातर्फे ईद साजरी, घरीच नमाज अदा...कोरोना'मुक्तीसाठी प्रार्थना !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोना साथीच्या आजारामुळे धर्मगुरु साहेब यांच्यामार्फत जगभरात प्रत्येक बोहरा समाज बांधवांच्या घरात दोन महिन्यांचा किराणा देण्यात आला होता.

जळगाव : येथील दाऊदी बोहरा समाज बाधवांनी त्यांच्या घरी ईदची नमाज अदा केली. नमाजनंतर देश, जगासाठी कोरोना साथीच्या आजारापासून मुक्तीसाठी व भारताची प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. 

नमाजनंतर एकमेकांना मोबाईल व सोशल नेटवर्कर पद्धतीने ईंदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे. काल (22) बोहरा समाजातील 30 दिवसाचे रोजे पूर्ण झाले आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे बोहरा समाजात घरी राहून नमाजची प्रार्थना करण्यात आली. बोहरा समाजातील 53 वे धर्मगुरु सैयदना आली कदर मुफद्दल सैफुद्दीन साहेब (TUS) यांच्यामार्फत प्रत्येक घरात थेट लाईव्ह मजलिसचे आयोजनही करण्यात आले होते. त्यामुळे समाजातील लोक दिवसभर प्रार्थनेत राहिले. धर्मगुरु साहेब यांच्यामार्फत ऑनलाईन सेमिनारचे आयोजनही करण्यात आले ज्यामध्ये लाभ घेणाऱ्या समाज बांधवांना व्यवसाय, धार्मिक, शिक्षण तसेच आरोग्याविषयी माहिती दिली गेली. ज्यामुळे समाजाला फायदा झाला. कोरोना साथीच्या आजारामुळे धर्मगुरु साहेब यांच्यामार्फत जगभरात प्रत्येक बोहरा समाज बांधवांच्या घरात दोन महिन्यांचा किराणा देण्यात आला होता. 

बोहरा समाजाचे अध्यक्ष आमिल साहेब सेफुद्दीनभाई अमरावतीवाला, सेक्रेटरी मोईजभाई लेहरी, खजिनदार युसुफभाई मकरा, जोईट सेक्रेटरी मोईजभाई झेनीत व अंजुमन ई हुसेनी कमेटीचे सर्व मेंबर्स यांनी जळगाव बोहरा समाजाचे 280 घरांसोबत नियमित दूरध्वनीने संपर्कात राहत असून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येत आहे. धर्मगुरु डिपार्टमेंट कडून दिवसातून दोन- तीन तास बोहरा समाजाबाबत धार्मिक माहिती व कुराण पठण करण्यात आले आहे. 

बोहरा समाजाचे धर्मगुरुतर्फे जळगाव शहरात इतर समाजातील गरजूंना तयार जेवणाचे पार्सल देण्यात आले. बोहरा समाजातील काही नागरिकांनी आप आपल्या पद्धतीने किराणा सामान इतर समाजात देण्यात आला. बोहरा समाजातर्फे सर्व बोहरा समाज बाधवांना सांगण्यात आले की त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर द्यावा, इतर बाबतीत सहकार्य करावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eid celebration by Bohra community