esakal | हिंदुत्व विचारधारेमुळे ठाकरेंना खडसे, मुंडे जवळचे वाटतात : एकनाथराव खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

संगमनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात पर्यावरणमंत्री व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यात म्हटले होते, की भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते तुम्हाला जवळचे वाटतात.

हिंदुत्व विचारधारेमुळे ठाकरेंना खडसे, मुंडे जवळचे वाटतात : एकनाथराव खडसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेना व भारतीय जनता पक्षाची वर्षानुवर्षे युती राहिली आहे. हिंदुत्व ही आमची विचारधारा राहिलेली आहे. त्यामुळेच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना एकनाथ खडसे व पंकजा मुंडे जवळचे वाटत असावे, असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 

नक्‍की पहा - "डिपीडीसी' गाजविणारे गुलाबराव आज अध्यक्षाच्या खुर्चीवर
संगमनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात पर्यावरणमंत्री व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यात म्हटले होते, की भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते तुम्हाला जवळचे वाटतात. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते, की एकनाथराव खडसे व पंकजा मुंडे हे दोन्ही नेते आम्हाला जवळचे वाटतात. हे दोन्ही नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते महाविकास आघाडीसाठी आवश्‍यक आहेत. 
याबाबत एकनाथराव खडसे यांना आदित्य ठाकरे यांच्या मतावर प्रश्‍न विचारला असता, खडसे म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची वर्षानुवर्षे युती राहिलेली आहे, हिंदुत्व ही आमची विचारधारा राहिलेली आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांना खडसे व मुंडे जवळचे वाटत असावे.