Loksabha 2019 : मतदान चिठ्ठ्या अद्याप पोचल्या नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जळगाव ः जिल्ह्यात "बीएलओं'ना मतदारांना मतदान चिठ्ठ्यावाटपास देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक मतदारांपर्यंत त्या पोहोचल्या नाहीत. यामुळे आज अनेक मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यावर चिठ्ठ्यावाटपाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. 
मतदानास अवघा एक दिवस बाकी राहिला असताना, मतदान चिठ्ठ्या न पोहोचल्याने मतदारांना मतदारयादी क्रमांक, ठिकाण समजण्यास अडचणी येणार आहेत. त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्‍यता आहे. 
 
अनेकांची नावे मतदारयादीतून गायब 

जळगाव शहरातील अनेक मतदारांची नावे सात महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी मतदारयादीत होती. मात्र, नेमकी त्यांची नावेच मतदारयादीतून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मतदारांकडे काही वर्षांपूर्वी काढलेले मतदानाचे ईपीक कार्ड' आहे. मात्र, मतदारयादीत नावे नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. 
 
"व्हीव्हीपॅट'च्या प्रात्यक्षिकाचा लाभ 
जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी तीन हजार 532 मतदान केंद्रांमध्ये "व्हीव्हीपॅट'चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. यामध्ये पाच लाख 20 हजार 636 मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, तर चार लाख 53 हजार 228 मतदारांनी याचा वापर करून बघितला आहे. 

Web Title: marathi news jalgaon election chit no distrbute