"त्या' चाळीस जागांभोवती फिरणार सत्तेचे गणित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जळगाव : "सकाळ'च्या एक्‍झिट पोलमध्ये भाजपचे 14 व शिवसेनेचे 10 उमेदवारांच्या विजयाची शक्‍यता 100 टक्के असून विविध 40 उमेदवारांच्या विजयाची शक्‍यता 60 ते 90 टक्के असल्याने हे 40 उमेदवार पालिकेतील सत्तेचे समीकरण ठरवू शकतील. तर प्रचंड चुरस असलेल्या 9 जागांवर दोन्ही उमेदवारांची विजयाची शक्‍यता 50-50 टक्के असल्याने तेदेखील निर्णायक ठरू शकतील. 

"सकाळ'च्या एक्‍झिट पोल'मध्ये भाजप निर्णायक बहुमत मिळविण्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे 60 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत विजयाची शक्‍यता असलेल्या उमेदवारांमध्येही भाजपचे 25 उमेदवार असून शिवसेनेचे फक्त 15 उमेदवार आहेत. तर 50-50 टक्के अशी चुरस असलेल्या जागांमध्ये भाजपचे 5 व शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत. 

तीन पुरस्कृतांना कौल 
"एक्‍झिट पोल'मध्ये लोकांनी शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या 3 अपक्षांच्या पारड्यात आपला कौल टाकला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही दोन जागांवर कौल देण्यात आला आहे. परंतु, या दोन जागांसाठी राष्ट्रवादीला विजयाची शक्‍यता 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंतच दर्शविण्यात आली आहे. 
 
असा घेतला कौल 
"सकाळ'ने महापालिका निवडणुकीसंदर्भातील या "एक्‍झिट पोल'चा कौल चार टप्प्यात घेतला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी रात्री तर बुधवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत, दुपारी 3 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 6 वाजेनंतर अशा तीन टप्प्यात प्रत्यक्ष विविध प्रभागात जाऊन तेथील विविध स्तरातील, विविध व्यवसायाशी संबंधित नागरिकांशी संवाद साधून हा कौल काढण्यात आला आहे. 19 प्रभागातून "सकाळ'च्या प्रतिनिधींनी सुमारे 1900 नागरिकांकडून निकालाचा अंदाज जाणून घेतला. त्यातून हा "एक्‍झिट पोल' समोर आला आहे. 

असा आहे एक्‍झिट पोल ( 
 
भाजप 
100%-----60-90% ---- 50-50% 
14-------25--------------5 
शिवसेना 
100%------60-90%------50-50 
10-----------15 ----------- 4 
राष्ट्रवादी 
50-60% 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election sakal exit pole 40 seat