सीमेवरील जवानांनाही मतदान शक्‍य 

भुषण श्रीखंडे
शुक्रवार, 20 जुलै 2018

जळगाव ः सीमेवरील सैनिकांना आतापर्यंत केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकीतच मतदानाचा हक्क बजावता येत होता. परंतु, निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही या सैनिकांना मतदान करता यावे, यासाठी अध्यादेश काढला. त्यानुसार महापालिकेच्या या निवडणुकीत शहरातील मतदार असलेल्या 135 जवानांना मतदान करता येणार आहे. अशाप्रकारचा अध्यादेश काढल्यानंतर सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान करण्याच्या सुविधेची ही पहिलीच वेळ असेल. 

देशातील विविध सीमेवरील तसेच सैनिकांच्या कॅम्पवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांना केवळ लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीतच "सर्व्हिस व्होटर' म्हणून मतदान करता येत होते. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान करता येत नसल्याने निवडणूक आयोगाने या सैनिकांनाही 
या निवडणुकीमध्ये मतदान करता यावे यासाठी 25 मे 2018 ला अध्यादेश काढले. 

शहरात 135 सैनिक 
महापालिका 2018 च्या सार्वत्रिक निवडणूक ही 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी होत आहे. त्यानुसार 19 प्रभागांच्या मतदारयाद्या देखील तयार केलेल्या आहे. त्यात शहरातील वास्तव्यास असलेले व सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या 135 सैनिकांची यादी प्रभागनिहाय तयार केली आहे. 

"सर्व्हिस व्होटर'नुसार मतदानाचा हक्क 
सीमेवरील सैनिकांना टपालाद्वारे मतपत्रिका (पोस्टल व्होट) पाठवून मतदानाच्या प्रक्रियेला "सर्व्हिस व्होटर' म्हणतात. त्यानुसार 19 प्रभागातील 135 सैनिकांची यादी असून "सर्व्हिस व्होटर' माध्यमातून या सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

मतपत्रिका रवाना 
शहरातील 135 सीमेवरील सैनिकांना मतदानासाठी आज मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. स्पीड पोस्टाद्वारे या सैनिकांच्या कार्यालयात हे मतपत्रिका पाठविल्या असून सैनिकांनी यावर मतदान करून त्या परत आल्यावर 3 ऑगस्टला मतमोजणीच्या दिवशी या मतांची मोजणी होईल. 

मनपा निवडणुकीपासून प्रारंभ 
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार "सर्व्हिस व्होटर' सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यानुसार राज्यातील पहिला बहुमान जळगाव महापालिकेला मिळाला आहे. त्यानुसार 1 ऑगस्टला होणाऱ्या मतदानापासून प्रारंभ होत आहे. 

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे मतदान सैनिकांना करता येणार आहे. जळगाव महापालिका निवडणुकीपासून याचा राज्यात प्रारंभ होत असून, ही अभिमानाची बाब आहे. या सैनिकांना मतपत्रिका आज पाठविल्या आहेत. 
- चंद्रकांत डांगे, मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी 
 
Web Title: marathi news jalgaon election vote border senajavan