थकीत बिलापोटी "वाघूर'चा वीजपुरवठा चार तास खंडित 

थकीत बिलापोटी "वाघूर'चा वीजपुरवठा चार तास खंडित 

जळगाव ः पाणीपुरवठा योजनांच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी "महावितरण'कडून वीज कनेक्‍शन कट करण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत थकीत बिलासाठी आज महापालिकेच्या वाघूर पंपिंगचे वीज कनेक्‍शन कापण्यात आले होते. थकीत बिलाची काही रक्‍कम भरण्यात आल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. 
सामूहिक पाणी योजनांसाठी "महावितरण'कडून वीज कनेक्‍शन देण्यात आले आहे. परंतु पाणी योजनांच्या बिलाचा नियमित भरणा करण्यात येत नसल्याने थकबाकीची रक्‍कम वाढली आहे. यात शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका योजनांसाठी चार कनेक्‍शन देण्यात आले आहेत. या कनेक्‍शनची मिळून महापालिकेकडे 1 कोटी 38 लाख रुपयांची रक्‍कम थकलेले आहेत. यात महापालिकेच्या वाघूर पंपिंगवरील दोन कनेक्‍शनवरील 1 कोटी 22 लाखाच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई "महावितरण'कडून दुपारी करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होऊ नये, यासाठी महापालिकेकडून तातडीने 66 लाखाचा धनादेश तयार करून देखील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर वीज पुरवठा जोडून देण्यात आला होता. तरी देखील वाघूर पंपिंगवरील वीजपुरवठा चार तास खंडित राहिला होता. 

चार तास जलकुंभ भरले नाही 
"महावितरण'ने दुपारी बारा ते चारपर्यंत वीजपुरवठा खंडित केल्याने पाणी जलकुंभात भरले गेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कमी पाणीपुरवठा सोमवारी करण्यात आला. त्यामुळे चार तासांत 1 कोटी लिटर पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याने उद्या (20 नोव्हेंबर) काही भागात कमी पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

खासदारांनी सूचना देऊनही वीजपुरवठा तोडला 
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीची बैठकीत खासदार ए. टी. पाटील यांनी दुष्काळ जन्य परिस्थिती असल्याने कोणत्या पाणी पुरवठ्याबाबत वीज कनेक्‍शन तोंडण्याच्या सूचना महावितरणच्या अभियंत्यांना केल्या होत्या. तसेच थकीत वीजबिलाबाबत आयुक्त चंद्रकांत डांगे, पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी महावितरणच्या अभियंत्यांना सोमवारी वीजबिल भरण्याचे सांगूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा तोडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com