अभियांत्रिकीच्या निकालासाठी "तारीख पे तारीख' 

अमोल कासार
मंगळवार, 21 मे 2019

जळगाव : गेल्या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजिकल्स विद्यापीठांतर्गत (बाटू) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमातील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुर्नतपासणीसाठी (रिचेकिंग) अर्ज केले होते. मात्र, या निकालाची तारीख तीन वेळा जाहीर करून ती पुढे ढकलण्यात आली होती. महिना उलटून देखील "रिचेकिंग'चा निकाल लागलेला नसल्याने निकालासाठी "बाटू'कडून विद्यार्थ्यांना "तारीख पे तारीख' दिली जात आहे. "बाटू'च्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची नोकरीसाठी फरफट रोखण्यासाठी राज्यशासनाकडून रायगड तालुक्‍यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजिकल्स विद्यापीठांतर्गत (बाटू) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, माहिती तंत्रज्ञान यासह कृषीविषयक पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाला गेल्या वर्षीपासून सुरवात करण्यात आली. राज्यात 168 तर खानदेशात जळगाव, भुसावळ, धुळे, शिरपूर, फैजपूर या ठिकाणांवरील सात महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाला सुरवात झाली आहे. "बाटू' विद्यापीठ हे ऑटोनॉमस असल्यामुळे तसेच या विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास त्याचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत परीक्षा होत असल्याने याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक होता. त्यामुळे पहिल्याच वर्षी "बाटू'अंतर्गत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश "फुल्ल' होते. 

दुसऱ्याच्या वर्षी "बाटू'चा फज्जा 
"बाटू' विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रमाचा निकाल हा किमान 45 ते 55 दिवसांच्या आत लागणे आवश्‍यक आहे. मात्र या अभ्यासक्रमांचा निकाल हा तब्बल 118 दिवस उशिराने लागल्यामुळे दुसऱ्याच वर्षी "बाटू'च्या कारभाराचा फज्जा उडाला आहे. 

विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा 
"बाटू'अंतर्गत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा एप्रिलमध्ये निकाल लागल्यानंतर परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी "रिचेकिंग'साठी अर्ज केले होते. त्याचा निकाल हा किमान पंधरा ते वीस दिवसांमध्ये लागणे अपेक्षित होते. "बाटू'कडून सुरवातीला 13 मेस निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा ही तारीख पुढे ढकलून 17 मे जाहीर करण्याचे सांगण्यात आले होते; परंतु 17 रोजी पुन्हा ही तारीख पुढे ढकलून आता 25 मेस निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे "बाटू'ने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले असल्याने "रिचेकिंग'साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकडून निकालाची प्रतीक्षा केली जात आहे. 

निकालाआधीच परीक्षेची तारीख जाहीर 
"बाटू' अंतर्गत अभियांत्रिकी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा "रिचेकिंग'चा निकाल अद्याप देखील लागलेला नसून 25 मेपर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे "बाटू'कडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. "रिचेकिंग'साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा 
27 मेपासून घेण्यात येणार असल्याचे "बाटू'ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. मात्र, रिचेकिंगचा निकालच लागलेला नसताना देखील परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने परीक्षेचा अभ्यास कधी करावा? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon engeeniaring result date to date