esakal | ट्रू जेट'तर्फे एक सप्टेंबरपासून जळगाव ते मुंबई सेवा 
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रू जेट'तर्फे एक सप्टेंबरपासून जळगाव ते मुंबई सेवा 

ट्रू जेट'तर्फे एक सप्टेंबरपासून जळगाव ते मुंबई सेवा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः तब्बल चार महिन्यांपासून जळगावातून विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. नव्याने "ट्रू जेट' या कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे. जळगाव ते मुंबई व अहमदाबाद ते जळगाव अशा दोन ठिकाणावरून ही सेवा सुरू होणार आहे. सोमवारपासून (ता.26) विमान सेवेची तिकीट विक्री होणार आहे. 

विमान प्राधिकरणातर्फे ट्रू जेट कंपनीस विमान सेवा सुरू करण्याबाबतच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. यामुळे एक सप्टेंबरपासून विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती ट्रू जेट कंपनीच्या सूत्रांनी "सकाळ'ला दिली. जळगाव ते मुंबई व अहमदाबाद हे जळगाव दरम्यान सुरू होणाऱ्या या सेवेला प्रवाशांच्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. 

26 पासून खिडकीवर तिकीट 
"ट्रूजेट' च्या वेबसाइटवर ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सेवा आहे. अनेक नागरिकांनी ऑनलाइन तिकीट बुकही केले आहेत. मात्र विमानतळावर जाऊन तिकीट आरक्षणाची सुविधा नाही. सोमवारपासून (ता. 26) जळगाव ते मुंबई, जळगाव ते अहमदाबाद अशी तिकीट विक्री सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

जळगाव ते पुणे सेवा हवी 
"ट्रू जेट' कंपनीने जळगाव ते मुंबई अशी सेवा नियमितपणे दिली पाहिजे. सोबतच जळगाव ते पुणेही सेवा सुरू करायला पाहिजे. पुणे येथे अनेक व्यापारी, उद्योजक, युवा वर्ग नोकरीनिमित्त जातात. या सेवेत सातत्य असायला पाहिजे अशी मागणी रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष विनोद बियाणी यांनी केली आहे. 

loading image
go to top