"ईव्हीएम'च्या गैरवापरविरोधात आता लढाई 

"ईव्हीएम'च्या गैरवापरविरोधात आता लढाई 

जळगाव ः देशात ईव्हीएम मशिनमार्फत गैरवापर होत असून ते लोकशाही व संविधानाला घातक ठरत आहे. यामुळे ईव्हीएम मशिनचा वापर होऊ न देणे व त्या विरोधात रस्त्यावरची लढाई बहुजन समाजाने लढायला हवी असे आज येथे झालेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या संविधान जागर रॅलीत ठरविण्यात आले. 

रवींद्र पाटील, दीपाली पेंढारकर, प्रियंका बनसोडे, प्रतिभा शिरसाठ, राजेंद्र खरे, ईश्‍वर मोरे यांनी यावेळी भाषणे केली. रत्ना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक सपकाळे यांनी प्रास्ताविक केले. सुनील देहडे यांनी आभार मानले. 
बहुजन क्रांती मोर्चातर्फे कानळदा येथून तालुका संयोजक प्रतीक सपकाळे यांच्या नेतृत्वात 200 ते 250 मोटारसायकलींची मोटार सायकल रॅली काढण्यात आली. "संविधान झिंदाबाद, 
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..' च्या घोषणा देत जळगाव येथील रेल्वे स्थानकाजवळील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते आले होते. 
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास जळगाव तालुका संयोजक सपकाळे यांनी माल्यार्पण केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, महिला महानगर अध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजू खरे, रिपाइं जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायडे, पप्पू अडकमोल आदी उपस्थित होते. सर्वश्री. खरे, ऍड.पाटील, रिपाइं महानगर प्रमुख अनिल अडकमोल, सारिका बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, आर. के. सपकाळे, हर्शल सोनवणे, दीपक बाविस्कर यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com