esakal | मित्रासोबत वेळ घालविल्यानंतर घरी परतताना मृत्यूने गाठले 
sakal

बोलून बातमी शोधा

car  accident

मित्रासोबत वेळ घालविल्यानंतर घरी परतताना मृत्यूने गाठले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः मित्रासोबत बाहेर कारने गेले असताना घरी परतत असताना कोल्हे हिल्सजवळ अपघात झाला. समोरन येणाऱ्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कार पलटी होवून यात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. 

हेपण वाचा - उचलून घरात नेले..तिच्यासोबत खेळलीही...नंतर बुडविले पाण्याच्या टाकीत


शहरातील वाघनगर परिसरातील राहणारा भुपेंद्र संतोष पाटील (वय 32) हे आयसीआयसीआय बॅंकेत कामास होते. रविवारची सुटी असल्याने मित्रांसोबत कोल्हे हिल्स टेकडीवर अलाफ कुलकर्णी (रा. मुंदडानगर) याच्या कारने (एच.एच. 19, बीजे 0898) गेले होते. मित्रांसोबत गप्पा मारत हसी मजाक करत साधारण दीड तास घालविला. परंतु सायंकाळी सहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी चारही मित्र घरी पतरले होते. यावेळी भुपेंद्र पाटील हा कार चालवित होता. टेकडीवरून कार खाली उतरवीत असताना समोर येणारी कारला वाचविण्याच्या प्रयत्नात भुपेंद्रचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कार रोडाच्या खाली उतरून तीन वेळा पलटी झाली. यात भुपेंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नातेवाईकांचा आक्रोश 
कार पलटी झाल्याचे दिसताना परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भुपेंद्रसह अन्य तिघांना जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मयत भुपेंद्रच्या नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला. पत्नी सपना, आई उषा आणि वडील संतोष पाटील यांनी भुपेंद्रचा मृतदेह पाहून हांबरडा फोडला. 
 

loading image