esakal | उचलून घरात नेले.. तिच्यासोबत खेळलीही.. नंतर बुडविले दोनशे लिटरच्या ड्रममध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

girl death

वडील मेडिकलवरुन गोळ्या आणि डायपर आणण्यासाठी खाली उतरले. इतक्‍यात मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. 3 तास होऊनही मुलगी मिळत नाही म्हणून हुडको, आजादनगरात मुलीचा शोध घेतल्यानंतर अर्ध्या तासाने मुलीचा मृतदेह तिच्याच बिल्डिंगमध्ये आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. 

उचलून घरात नेले.. तिच्यासोबत खेळलीही.. नंतर बुडविले दोनशे लिटरच्या ड्रममध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पिंप्राळा हुडकोतील चार वर्षीय आर्शिन बी शाबीर शहा या मुलीचा मृत्यू अपघाती नसून पाण्याच्या टाकीत बुडविण्याचा खोडसाळपणा या चिमुरडीच्या जिवावर बेतला आहे. शेजारच्याच बारा वर्षीय मुलीने तिला पाण्याच्या टाकीत बुडविल्याने तिचा मृत्यू झाल्याची बाब पोलिस चौकशी व मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झाली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीवर याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

हेपण वाचा - पाच वर्षाची चिमुरडी ती...धावली, ओरडली 

पिंप्राळा हुडकोतील स्थलांतरित दूध फेडरेशन नव्या बिल्डिंगमध्ये शाबीर शहा हबीब शहा, पत्नी रिजवाना, चार वर्षीय मुलगी आर्शिनसह (बिल्डिंग-ए ब्लॉक नं.59 चौथा मजला) येथे राहतात. मंगळवारी (ता.11) सकाळी आर्शीनची अंघोळ घातल्यावर रिजवानाबीने तिला गॅलरीत उन्हात उभे करुन घरात तिचे कपडे घेण्यासाठी गेली होती. वडील मेडिकलवरुन गोळ्या आणि डायपर आणण्यासाठी खाली उतरले. इतक्‍यात मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. 3 तास होऊनही मुलगी मिळत नाही म्हणून हुडको, आजादनगरात मुलीचा शोध घेतल्यानंतर अर्ध्या तासाने मुलीचा मृतदेह तिच्याच बिल्डिंगमध्ये आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. 

नक्‍की पहा - ट्रकच्या धडकेत मुलगा रोडावर अन्‌ बाप ओरडला पण... 

वडिलांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केल्याने मृतदेह घरी आणला. मात्र, नातलग व परिसरातील रहिवाशांना नेमके काय झाले हे समजत नव्हते. त्यामुळे आर्शिनचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. शहरातील असंख्य तरुण, राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी गर्दी करुन वैद्यकीय समितीसमक्ष "इन-कॅमेरा' शवविच्छेदनासाठी हट्ट धरल्याने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन होऊन नुकताच त्याचा अहवाल प्राप्त झाला होता. 

खोडसर वृत्तीचा बळी 
शाबीरशहा राहत असलेल्या इमारतीत दोन खोल्या सोडून वास्तव्यास असलेल्या बारावर्षीय सुभाना (काल्पनिक नाव) या मुलीचे आईवडील बाहरेगावी गेले असल्याने ती एकटी होती. ही मुलगी खोडसर आणि मानसिक आजारीसारखी वागत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही झाल्या असून तिच्या आई- वडिलांनाही याची कल्पना होती. मात्र, योग्य उपचार न केल्याने शेवटी अनर्थ घडलाच. सुभाना हिनेच आर्शिनला उचलून घरात नेले, तिच्यासोबत खेळलीही. नंतर खोडसरपणातून तिला घाबरवण्याच्या नादात बाथरुममधील दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये बुडविले. 

अहवालातील तथ्य 
ड्रममध्ये आर्शिन हातपाय झटकू लागली. त्यातून तिच्या कपाळाला आणि डोक्‍याला मागील बाजूस मार लागल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवाल आल्यावर उपनिरीक्षक कांचन काळे, निता कायटे यांनी सुभाना व तिच्या वडिलांची सलग चौकशी केल्यानंतर तिने घडला प्रकार उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम, अनिल बडगुजर यांच्यासमोर मांडला. त्यावरुन अल्पवयीन मुलीविरोधात रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

loading image
go to top