बळकावलेल्या घरकुलांवर टोलेजंग बंगला 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 July 2019

जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे. 

जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे. 

पिंप्राळा परिसरातील महापालिकेच्या पाचशे घरकुलांवर अवैधरीत्या अनेकांनी ताबा मिळविलेला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने ही घरकुले ताब्यात घेण्याची मोहीम उपायुक्‍त चंद्रकांत खोसे यांच्या मार्गदर्शनात आज सुरू केली. कारवाईप्रसंगी सहाय्यक अभियंता सोनगीरे, अतिक्रमण निमूर्लन विभागाचे अधीक्षक एच. एम. खान, मिळकत व्यवस्थापक राजेंद्र पाटील, लिपिक संजय पवार आदी कर्मचारी तसेच पुरुष व महिला पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

घरकुलांचा झाला बंगला 
कारवाईप्रसंगी चार घरकुल असलेल्या जागेवर एकाने तर टोलेजंग बंगला तयार केला. त्यात लॉन, बगीचा तयार केल्याचे समोर आले. यावेळी कागदपत्रे मागितली असता कोणालाही कागदपत्रे पथकाकडे सादर करता आली नाही. 

कारवाईप्रसंगी शाब्दिक वाद 
36 घरकुल ताब्यात घेण्याच्या कारवाईप्रसंगी अनेक ठिकाणी बळकावलेल्या अनेकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वाद घातला. काहींनी तर समोरील अपूर्ण अवस्थेतील घरकुलांचे सामान काढून ही घरकुले तयार केल्याचे समोर आले. तर काही जण स्वःखर्चाने लावलेले साहित्य तत्काळ काढून घेताना धावपळ करत होते. 

काही घरकुलांमध्ये गैरप्रकार 
अनधिकृतरीत्या बळकावलेल्या काही घरकुलांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. यात प्रामुख्याने देहविक्रीचा व्यवसाय असल्याचे दिसून येत असल्याचे माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gharkul bangla