"ती' 76 घरकुले मनपाने घेतली ताब्यात 

"ती' 76 घरकुले मनपाने घेतली ताब्यात 

जळगाव ः दूध फेडरेशनजवळील दांडेकरनगरातील झोपडपट्टीतील नागरिकांना पिंप्राळा हुडको येथे घरकुले "लकी ड्रॉ'द्वारे दिली होती. यातील 76 घरकुलांचे कुलूप तोडून परस्पर काही जणांनी ताबा घेतल्याने खऱ्या लाभार्थ्यांनी महापालिकेत गोंधळ घातला होता. आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी 76 घरकुले खाली करून कुलूप लावण्यात आले. तसेच या घरकुल वाटपचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत ठेवला जाणार आहे. 
शहरातील दूध फेडरेशनजवळील दांडेकरनगर झोपड्या हटविल्या होत्या. या सर्व कुटुंबांना एकात्मता गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत पिंप्राळा- हुडको येथे घरकुल देण्याचे महापालिकेकडून निश्‍चित करण्यात आले होते. यापैकी 276 घरकुलांचे वाटप केले होते तर तयार झालेल्या 76 घरकुलांचा "लकी ड्रॉ' काढून महापालिका वाटप करणार होते. परंतु, काही जणांनी महापालिकेने लावलेले कुलूप तोडून या घरकुलांचा परस्पर ताबा घेतला होता. ही घरकुले महापालिका प्रशासनाने गुरुवारी खाली केली आहेत. 

महासभेत घरकुल वाटपाचा प्रस्ताव 
76 घरकुलांची वाटप हे ज्या प्रमाणे घरे उठविले त्या प्रमाणे द्यावी, अशी मागणी वंचित लाभार्थ्यांकडून होत आहे. याबाबत घरकुल वाटपाचा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवला जाणार आहे. महासभेत झालेल्या निर्णयानुसार या घरकुलांचे वाटप केले जाणार आहे. 

156 घरकुलांचा प्रस्ताव म्हाडाकडे 
156 घरांचा प्रस्ताव "म्हाडा'कडे पाठविण्यात आला आहे. याबाबत अद्याप म्हाडाने मंजुरी दिली नसून, मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र व राज्यशासनाकडे हा प्रस्ताव महापालिका पाठविणार आहे. 76 घरकुलांचे वाटप केल्यानंतर राहिलेल्या लाभार्थींना त्यात समावेश केला केला जाणार आहे. तसेच स्वःमालकीच्या जागेवर 141 घरकुलांचा प्रस्तावही म्हाडाकडे पाठविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com