मृत्यूदरावर गिरीष महाजनांनी व्यक्त केली चिंता; पाच व्हेंटीलेटर सुपूर्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

डायरेक्‍टर तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे लक्ष देऊन काय उपाय योजना करण्यात येतील यावरही चर्चा करण्यात आली.

जळगाव ः जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आणि कोरोनामुळे मृत्यू पावत असलेल्यांचा दर अधिक आहे. याबाबत माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी चिंता व्यक्त करत हा दर कमी करण्यासाठी खबरदारी घेवून योग्य उपाययोजना करण्याबाबत सुचना दिल्या. 
शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आमदार महाजन यांनी कामकाजाबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार सुरेश भोळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. हनुमंतराव पोटे, डॉ. किरण पाटील आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार महाजन यांनी आढावा घेताना मृत्यूदर कमी करण्यासाठी खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीत त्यांनी डायरेक्‍टर तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे लक्ष देऊन काय उपाय योजना करण्यात येतील यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी करोणा रुग्णावर उपचार करत असताना त्यांना सर्व अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. खैरे यांना सांगितले. 

पाच व्हेंटीलेटर केले सुपूर्द 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाच व्हेंटिलेटरची व्यवस्था आमदार गिरीश महाजन यांनी करून दिली. याबद्दल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी आभार व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girish mahajan medical collage reviwe corona