esakal | "गिरणा' 80; वाघूर धरण 54 टक्के भरले 
sakal

बोलून बातमी शोधा

"गिरणा' 80; वाघूर धरण 54 टक्के भरले 

"गिरणा' 80; वाघूर धरण 54 टक्के भरले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या 86 टक्के पाऊस पडल्याने मोठ्या धरणांत समाधानकारक जलसाठा झाला आहे. मध्यम तेरापैकी चार प्रकल्पांत 100 टक्के, सहा प्रकल्पांत 50 टक्‍क्‍यांवर जलसाठा आहे, तर तीन प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. मोठ्या धरणांपैकी गिरणा धरण 80, वाघूर धरण 54, तर हतनूर धरण 42 टक्‍के भरले आहे. यामुळे पाणीटंचाई संपल्यात जमा आहे. 
जूनमध्ये पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे यंदा पाऊस चांगला पडेल किंवा नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. परंतु पावसाने जोर पकडत अनेक ठिकाणी अतिवृष्टी केली. यामुळे दोनच महिन्यांत एकूण सरासरीच्या 86 टक्के पाऊस झाला. अद्याप तब्बल एक महिना पावसाळा आहे. त्यामुळे 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस यंदा जिल्ह्यात पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

धरण--पाणीपातळी द.ल.घ.मी.--टक्केवारी 
हतनूर--211.16--42.90 
गिरणा--396.02--79.46 
वाघूर--230.30--53.09 
अभोरा--317.76--100 
मंगरूळ--331.50--100 
सुकी--373.20--100 
मोर--324.29--88.39 
हिवरा--282.50--21.12 
अग्नावती--0.00.0.00 
बहुळा--250.20--53.56 
तोंडापूर--385.20--100 
अंजनी--223.44--21.08 
गूळ--265.81--68.53 
भोकरबारी--227.50--0.00 
बोरी--266.27--73.64 
मन्याड--0.00--0.00 
 

loading image
go to top