अमेरिका-इराण यांच्यातील तणावामुळे सुवर्ण बाजारात चढउतार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

- आठवडाभरात सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत भाववाढ 
- सोने खरेदीचे प्रमाण काहीसे घटले 
- गुंतवणुकीपेक्षा मोडीकडे वाढता कल 

जळगाव : अमेरिका-इराण या दोन देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरची किंमत वाढणे व रुपयाचे भाव कमी झाल्याने सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या भावात सुमारे दोन हजार रुपयांनी वाढ झाली होती. तर दोन्ही देशांतील तणाव आता थोडा कमी झाल्याने लगेचच सोने, चांदीच्या भावात घसरण झाल्याने सुवर्ण बाजारात आठ दिवसांपासून चढउतार पाहावयास मिळत आहे. 

नक्‍की पहा - महिलांनो खाद्यतेलाचे दर पाहिले का?...वापर करावा लागणार कमी

अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या तणाव व युद्धजन्य स्थितीच्या घडामोडींचा जागतिक सोने बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे डॉलरच्या किमतीत वाढ, हे या वाढीमागचे कारण सांगण्यात येत आहे. सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 40 हजार 100 रुपये, तर चांदीचा भाव प्रतिकिलो 47 हजार 500 रुपये होता. सोन्याच्या भावात दोन ते अडीच हजारांनी, तर चांदीच्या भावात गेल्या आठ दिवसांतील स्थिती लक्षात घेता दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली. 

... तर भाव होतील कमी 
अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाच्या स्थितीवर सुवर्ण बाजारपेठेची स्थिती राहणार आहे. त्यांच्यात वाद कमी झाल्यास आठ-दहा दिवसांपूर्वी असलेले भाव कमी होण्याची शक्‍यता आहे. परंतु दोघांतील युद्धजन्य स्थिती अधिक वाढल्यास सोने, चांदीचे भाव वाढून सोने 45 हजारांवर जाण्याची शक्‍यता सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविली आहे. 

अमेरिका व इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुवर्ण बाजारात चढ-उतार सुरू आहे. त्यांच्यातील वाद कमी झाल्यास भाव कमी होतील. मात्र, वाद वाढल्यास सोने 45 हजारांवर जाण्याची शक्‍यता आहे. 
- संदीप पोतदार, व्यवस्थापक. 
पी. एन. गाडगीळ आणि सन्स, जळगाव 

 
गेल्या दहा दिवसांचे सोने, चांदीचा भाव 
तारीख सोने (10 ग्रॅम भाव) चांदी (प्रतिकिलो भाव) 

1 जानेवारी...............39.500..................48.000 
2 जानेवारी.............. 39.500..................48.000 
3 जानेवारी.............. 39.500..................48.000 
4 जानेवारी.............. 39.800..................48.000 
5 जानेवारी.............. 39.800..................48.000 
6 जानेवारी.............. 41.400..................49.000 
7 जानेवारी.............. 41.850..................49.000 
8 जानेवारी.............. 41.850..................49.000 
9 जानेवारी................40.400................48.500 
10 जानेवारी..............40.100.................47.500 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gold rate high down america iran