esakal | सरकारी कर्मचाऱ्यांना उरले 205 दिवस काम 
sakal

बोलून बातमी शोधा

govrtrment employees

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्या निर्णयानुसार अतिरिक्‍त शनिवारच्या एकूण 44 सुटया त्यांना अधिक मिळत आहेत.त्यात या कर्मचाऱ्यांना सलग सुट्या घेणयाची संधी आता उर्वरित7 महिन्यात 11वेळा मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना उरले 205 दिवस काम 

sakal_logo
By
अतुल क.तांदळीकर

जळगाव : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने 5 दिवसांचा आठवडा जाहीर केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या सुट्यांत भरमसाठ वाढ झाली असून 2020 मधे आता उरलेल्या 307 दिवसांमध्ये 102 सुट्या मिळणार असल्याने त्यांची चंगळ होणार आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्या निर्णयानुसार अतिरिक्‍त शनिवारच्या एकूण 44 सुटया त्यांना अधिक मिळत आहेत.त्यात या कर्मचाऱ्यांना सलग सुट्या घेणयाची संधी आता उर्वरित7 महिन्यात 11वेळा मिळणार आहे , त्यामुळे सरकारी कार्यालयात बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांच्या जागा वर्षभरात शेकडयाहून अधिक दिवस रिक्‍त दिसणार आहेत. 

सरकारने घेतलेल्या निर्णयात या कर्मचाऱ्यांना 45 मिनिटांचे अतिरिक्‍त काम दिले असले तरी या वर्षातील उरलेल्या कार्यालयीन कामकाजाच्या 205 दिवसात ते केवळ 9225 मिनिटे अधिक होते,मात्र ते वाढलेल्या सुट्याच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे. 

नक्की वाचा : सावधान...मिठाई स्वरूपात शरीरात शिरतेय स्विट पॉयझन
 

फेब्रुवारी महिन्यात या कर्मचाऱ्यांना रविवारच्या चार आणि शिवजयंती आणि महा शिवरात्रीच्या दोन अशा सहा सुट्या मिळणार होत्या,शुक्रवार नंतर फोर्थ सॅटर्डेची रजा लागून घेता येत असल्याने सलग तीन दिवस ही सरकारी कार्यालये बंद राहतील आणि पुन्हा 29 तारखेची एक 
अतिरिक्‍त सुटी त्यांना मिळत आहे. यामुळे सामान्य लोकांची कामे अनेकदा खोळंबणार आहेत. 

हेच सलग सुट्यांचे चित्र या कार्यालयात मार्च,एप्रिल मे, ऑक्‍टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दिसणार आहे.या महिन्यात कर्मचारी शनिवारला लागून सुटया आल्याने सलग तीन अथवा चार दिवस कार्यालयात दिसणार नाहीत. सात आणि आठ मार्चच्या शनिवार-रविवारच्या सुट्यांना लागून 9 तारखेची रजा टाकली की 10 मार्चला धुलिवंदनाची सुटी आहे,त्यामुळे त्यांना सलग चार दिवस सुटी घेता येणार आहे.काही कर्मचारी गुढी पाडवा सेलिब्रेशनसाठी 21,22 मार्चला जोडून 23,24 ची रजा टाकून गुढी पाडव्यापर्यत सुटीवर राहतील. 2 
ते 6 एप्रिल राम नवमी ते महावीर जयंती असे चार दिवस,10 एप्रिल ते 14 एप्रिल म्हणजे गुड फ्रायडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे 4 दिवस सुटी घेऊ शकतात,मे महिन्यात या कर्मचाऱ्यांना 1 मे ते 3 मे आणि 23 ते 25 मे असे दोन वेळा तीन दिवस रजा घेण्याची संधी आहे. 

क्‍लिक कराः PHOTO होय. मीच बसवला शिवरायांचा पुतळा...म्हणत महिला ठिय्या 
 

ऑक्‍टोबर महिन्यात 30 तारखेला ईद शुक्रवारी असल्याने सलग तीन दिवस नोव्हेंबर महिना हा दिवाळी सणाचा महिना असल्याने 14 ते 16 आणि 28 ते 30 अशी सलग सुट्यांचे संधी आहे,आणि वर्षअखेरीस नाताळ हा सण देखील शुक्रवारी येत असल्याने 25 ते 27 किंवा त्यापेक्षा अधिक काळ रजेवर जाण्याची संधी हे कर्मचारी साधू शकतात. 

आर्वजून पहा :वडीलांनी रागविले म्हणून पळाले...पण "आधार'ने दिला आधार
 

307 दिवसातील 102 सुट्या 
मार्च: 11 दिवस 
एप्रिल: 12 दिवस 
मे: 13 दिवस 
जून: 8 दिवस 
जुलै: 8 दिवस 
ऑगस्ट: 11 दिवस 
सप्टेबर : 8 दिवस 
ऑक्‍टोबर: 11 दिवस 
नोव्हेंबर: 11 दिवस 
डिसेंबर: 9 दिवस 
(फेब्रुवारीचा 1 दिवस)