esakal | वडीलांनी रागविले म्हणून पळाले...पण "आधार'ने दिला आधार
sakal

बोलून बातमी शोधा

dhule child

वडीलांनी रागविले म्हणून पळाले...पण "आधार'ने दिला आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : परराज्यातून हरवलेले, पळून आलेल्या तिघांना आज जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यासाठी बालकल्याण समिती आणि शिरपूरस्थित बापूसाहेब एन. झेड. मराठे मतिमंद मुलांच्या बालगृहाने केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला. "आधारकार्ड'मुळे तिघांनाही आपले पालक मिळू शकले. 

क्‍लिक करा - दोन दिवस "ती' होती बेपत्ता...तिसऱ्या दिवशी सापडली रेल्वे ट्रॅकवर

तीन मुलांना काळजी व संरक्षणाची गरज असल्याने त्यांचा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ऍड. अमित दुसाणे, सदस्य प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड यांच्या आदेशाने मराठे बालगृहात प्रवेश झाला. बालगृहाचे अध्यक्ष भगवान तलवारे, सचिव सुनील मराठे, अधीक्षक प्रदीप पाटील, परेश पाटील यांच्या विशेष परिश्रमामुळे तिघे बालके पालकापर्यंत पोहचू शकले. 

हेपण वाचा - शिक्षकाची नोकरी सोडून तिने घेतले एसटीचे स्टेअरींग हाती...मिळविला बहुमान 

ते तिघे कोण? 
मोनू शर्मा (रा. बरना, ता. जि. कुरुक्षेत्र, हरियाना) पाच वर्षांपूर्वी घर चुकून रेल्वेने थेट मुंबईला पोचला. पोलिसांमार्फत नोव्हेंबरला कर्जत, नंतर डिसेंबरला धुळे बालकल्याण समितीमार्फत मराठे बालगृहात दाखल झाला. 
वडिलांनी "शाळेत का जात नाही', अशी विचारणा केल्यानंतर दीपक (रा. लिधौरा, एवनी, ता. गरौठा, जि. झाशी, उत्तर प्रदेश) घरून पळाला आणि रेल्वेने फेब्रुवारी 2019 ला भुसावळ, तेथून जळगाव बालकल्याण समिती, नंतर येथील समितीमार्फत मराठे बालगृहात दाखल झाला. मोहम्मद गुड्डू (रा. बाकरपूर, पो. दरियापूर, ता. जि. मुंगेर, बिहार) मुंबईच्या शासकीय निरीक्षण बालगृहानंतर येथील समितीमार्फत मराठे बालगृहात दाखल झाला. समितीने "व्हिडिओ कॉलिंग', "आधारकार्ड लिंक', "चाइल्ड लाइन'च्या माध्यमातून संबंधित राज्यांशी संपर्क साधून मराठे बालगृहाच्या मदतीने पालकांचा यशस्वी शोध घेतला. संबंधित मुलांना कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पालकांच्या स्वाधीन केले. ऍड. दुसाने, प्रा. सौ. पाटील, प्रा. राठोड, समाजकल्याण विभागाचे पी. यू. पाटील, "चाइल्ड लाइन'च्या मीना भोसले, श्री. तलवारे, श्री. मराठे, सुनील वाघ, रंजीत मोरे आदी उपस्थित होते.