यांचा वशिला म्हणूनच आपण मंत्री : गुलाबराव पाटील  

gulabrao patil
gulabrao patil

जळगाव : ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केलेला सत्कार माझी पुढील वाटचाल सुकर करण्यासाठी अधिक बळ देणारा असून जनतेच्या प्रेमाला उतराई होण्याचा प्रयत्न राहील. विकास कामाच्या बळावरच आपण जनतेचा विश्‍वास जिंकला आहे. आपल्या मंत्रिपदासाठीही जनता हाच वशिला लागला आहे. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. 

बोरनार येथे ग्रामस्थांतर्फे गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर गावातील विविध संस्थांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी विठ्ठल मंदिर ट्रस्ट सुयोग शिक्षण संस्था, उर्दू हायस्कूल पीक संरक्षण सोसायटी संत जगनाडे महाराज मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला भजनी मंडळ व ग्रामस्थांचा नागरी सत्कार करण्यात आला. 


यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, बोरणार गावाजवळील दळणवळणासाठी पुलाच्या बांधकामासाठी 80 लक्ष निधी मंजूर केला असून जळके, बोरणार व शिरसोली म्हसावद परिसरासाठी भागपूर उपसा सिंचन महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. जनतेच्या आशीर्वादरूपी भल्या भल्याना पाणी पाजून चार वेळा निवडून आलो. जनतेच्या वशिल्याने मंत्री झालो आहोत. 

सभागृहाचे भूमिपूजन 
शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत मंजूर असलेल्या 10 लक्ष निधीच्या सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, रमेश अप्पा पाटील, सचिन पाटील, चावदस कोळी, रवी कापडणे, मंगलसिंग पाटील, विष्णू अप्पा चिंचोरे, नारायण चव्हाण, धोंडू जगताप, गावच्या सरपंच सुमनबाई भिल, समाधान भाऊ चिंचोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com