शिवाजीनगरात रस्त्यातील अतिक्रमणांवर हातोडा ! 

shivaji nagar atikramn karvaee imege
shivaji nagar atikramn karvaee imege

जळगावः शहरातील शिवाजीनगरामधील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहिम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज दुपारी राबवली. यावेळी लाकुड पेठ येथील एका इमारतीच्या बाहेर रस्त्यावर उभारलेले शेड काढण्याची कारवाई करत असतांना पथकावर लोखंडी पाईपाने मारण्याचा प्रयत्न 
तसेच शिवीगाळ झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. उपायुक्त अजित मुठे हे घटनास्थळी येवून त्यांच्या 
उपस्थितीत हे अतिक्रमण काढण्यात आले. 

जळगाव शहरातील रस्त्यावरील झालेले अतिक्रमण काढण्याची मोहिम महापालिकेने सुरू केलेली आहे. त्यानुसार ही मोहिम सुरू असून आज शिवाजीनगरातील लाकुडपेठ रस्त्यापासून ही कारवाई सुरू केली. दुपारी एकच्या सुमारास लाकुडपेठ येथीलच एका इमारतीला लागून असलेले शेड थेट पाच ते सहा फुट रस्त्यात येत होते. याबाबत मालमत्ताधारकाला महापालिकेने शेड काढून घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतूू मालमत्ताधारकाने शेड न काढता आज कारवाई प्रसंगी अतिक्रमण निर्मूलन पथकाला शेड काढण्यास विरोध केला. यावेळी शाब्दीक चकामक होवून थेट मालमत्ताधारकाने पथकातील कर्मचाऱ्यांवर लोखंडी रॉड काढून मारण्याचा धमकी दिली. तसेच शिव्यांची लोखोळी वाहली. 

आर्वजून पहा : भिडे वाड्यातील मुलींची पहिली शाळा विकसीत करा : आमदार स्मिता वाघ

8 अतिक्रमणांवर कारवाईचा हातोडा 
शिवाजीनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यानुसार महाबळ रस्त्यावरील बुधवारी 
अतिक्रमण कारवाई केल्यानंतर आज शिवाजीनगरात सकाळी अकरा वाजता अतिक्रमण अधिक्षक 
एच. एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाचे पथक कारवाईसाठी शिवाजीनगरात गेले. कानळदा रस्ता, लाकुड पेठ, अमर चौक, क्रांती चौक, श्री मोर्टस पर्यतचे सुमारे 8 मोठे शेडचे अतिक्रमण सायंकाळी पाच पर्यंत काढण्यात आले. 

 रस्त्यात पाच ते दहा फुटापर्यंत अतिक्रमण 
शिवाजीनगरच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण कारवाई प्रसंगी सुमारे पाच ते दहा फुटापर्यतचे रस्त्यात अतिक्रमण झाल्याचे आढळून आले. एक घर चक्क आठ फुटापर्यंत तसेच एका धार्मिक स्थळाचे देखील अतिक्रमण हे पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com