जळगावात येथे होता हायप्रोफाईल कुंटनखाना; महाविद्यालयीन युवतींना घेतले ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कुंटणखाना चालविणारे मायलेक हे जळगावातील प्रतिष्ठित कुटुंबातील असून, विविध शासकीय अधिकाऱ्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधातून शहरातील विविध ठिकाणी हा प्रकार चालत असल्याचे समजते.  खेडी रोडवरील "ज्ञानचेतना अपार्टमेंट'मध्ये शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील मायलेक हाय प्रोफाइल कुंटणखाना चालवत असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. रोहन यांना मिळाली.

जळगाव : शहरानजीकच्या खेडी रोडवरील "ज्ञानचेतना अपार्टमेंट'मध्ये हाय प्रोफाइल कुंटणखाना सुरू असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वात सापळा रचून या कुंटणखान्यावर छापा घालून मायलेकासह दोन महिला व दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अटक केली. तसेच बुलेट मोटारसायकल (एमएच 19-पीएन 2121) व अल्टो कार (एमएच 19-बीजे 2121) जप्त केली असून, रात्री उशिरापर्यंत या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, कुंटणखाना चालविणारे मायलेक हे जळगावातील प्रतिष्ठित कुटुंबातील असून, विविध शासकीय अधिकाऱ्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधातून शहरातील विविध ठिकाणी हा प्रकार चालत असल्याचे समजते. 
खेडी रोडवरील "ज्ञानचेतना अपार्टमेंट'मध्ये शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील मायलेक हाय प्रोफाइल कुंटणखाना चालवत असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. रोहन यांना मिळाली. त्यावरून त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, एलसीबी एपीआय नीता कायटे, पंकज शिंदे, मारुतीराया, सुनील मोरे, गिरासे यांचे पथक तयार करून त्या परिसरात सापळा रचला. तेथे पोहोचताच संबंधित अपार्टमेंटमधील कुंटणखान्यात डमी ग्राहक पाठविण्यात आला. त्याने तेथून इशारा देताच दबा धरून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अपार्टमेंटमधील कुंटणखान्यावर छापा घातला. 

कुंटणखान्यात दोन विद्यार्थिनी, दोन महिला 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घातलेल्या छाप्यात शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयांतील दोन विद्यार्थिनी, दोन महिला व कुंटणखानाचालक मायलेक असे एकूण सहा जण मिळून आले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. 

पैशांच्या आमिषातून ओढायचे व्यवयासात 
शहरालगत असलेल्या मोकळ्या वस्त्यांमधील अपार्टमेंट तसेच घरांमध्ये संबंधित कुंटणखानाचालक मायलेक महाविद्यालयीन तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गैरकृत्य करवून घेत असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. 

कारसह बुलेटही जप्त 
संबंधित कुंटणखानाचालक मायलेकांकडे अल्टो कार तसेच बुलेटही आहे. खेडी रोडलगतच संबंधित कुंटणखानाचालक मायलेकांचे घर असून याठिकाणीही ते कुंटणखाना चालवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शहरातील विविध भागांत चालविल्या जाणाऱ्या इतर कुंटणखान्यांबद्दलही माहिती घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon high profile Kuntankhana lcb raid collage girl arrest

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: