घरकामगार, बांधकाम मजूर महिलांची उपेक्षाच! 

धनश्री बागूल
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

जळगाव : दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, पण डोक्‍यावर हक्काचं छत नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास घडतो...आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, पण सांगायचं कुणाला ? आपलं आयुष्य कष्टात गेलं, किमान मुलांचं शिक्षण नीट पार पडावं, यासाठी संघर्ष सुरू आहे...अशा अनेक समस्या घेऊन घरकामगार, कचरा वेचक आणि बांधकाम मजूर महिला जगण्याची लढाई लढत आहेत. 

शहरात कचरावेचक महिलांची संख्या हजारोच्या घरात आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच त्या कचरा, भंगार गोळा करण्यासाठी निघतात. सतत कचऱ्यात वावर असल्यामुळे त्यांना त्वचेचे रोग उद्‌भवू लागले आहेत. तर दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी काम करणाऱ्या घरकामगार महिलांची संख्या सुमारे 16 ते 17 हजाराच्या घरात आहे. घरकामगार महिला संघटित झाल्याने सरकारने 2009 ला त्यांच्यासाठी कायदा केला, मात्र गेल्या नऊ वर्षांपासून हा कायदा केवळ कागदावरच आहे. एकाही शासनाच्या योजनेचा लाभ महिलांना मिळालेल्या नाही. या योजनांमध्ये त्यांना आरोग्याची मोफत सुविधा, मुलांचे शिक्षण, पगारी आठवड्याची सुट्टी, पेन्शन अशा सुविधांचा लाभ मिळणार होता, मात्र अद्यापही त्यांना या सुविधा मिळू शकलेल्या नाहीत, असे घरकामगार महिलांनी सांगितले. 
 
कल्याणकारी मंडळ नावालाच 
शासनाने घरकामगार कल्याणकारी मंडळाची काही वर्षांपूर्वी स्थापना केली आहे. मात्र आतापर्यंत या मंडळाच्या माध्यमातून फक्त सन्मानपर रक्कम महिलांना देण्यात आली आहे. यातही 55 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या महिलांना शासनातर्फे दहा हजार रुपये देण्यात आले. तर बाकी योजना अमलात आलेल्या नाही. 

कामाची नोंद नाही 
घरकामगार महिला या कोणत्या ठिकाणी काम करतात, त्या मालकाची नोंद आवश्‍यक आहे. त्या नोंदणीवरच महिलांना योजनांमध्ये समाविष्ट केले जाते. यात सामान्य नोकरदार नागरिकांकडे काम केल्याच्या नोंदी होतात, परंतु अधिकारीवर्गाकडे ज्या महिला काम करतात, त्यांची नोंद मात्र होत नसल्याने त्यांना योजनांमध्ये समाविष्ट केले जात नाही. 

घरकामगार महिला, बांधकाम कामगार महिलांची संख्या शहरात हजारोंवर आहे. शासनाकडून कोणत्याही योजनांमध्ये उदासीनता असल्याने महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. 
- विजय पवार (पदाधिकारी, घरकामगार संघटना) 

Web Title: marathi news jalgaon house worker ledise