भेटण्यासाठी आलेल्या पतीला पाण्यातून दिले विषारी औषध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मुलाची भेट घेण्यासाठी गावावरुन हरिविठ्ठलनगरात आले. यावेळी पत्नीसोबत तिच्या घरात शालक सदानंद रामलाल कुमावत, त्याची पत्नी वैशाली, पत्नीच्या ओळखीतील एक व्यक्ती असे चौघे जण होते. संतोष कुमावत हे घराबाहेरील ब्युटीपार्लर दुकानात बसून मुलाची वाट पहात होते. 

जळगाव : अंतर्गत कलहामुळे पती- पत्नी विभक्‍त राहत असून, शहरातील हरिविठ्ठलनगरात मुलाबाळांसह राहणाऱ्या पत्नीच्या भेटीसाठी आलेल्या पतीला पिण्यासाठी पाणी देताना त्यात विषारी औषध टाकल्याची तक्रार पतीने पोलिसात दिली. याप्रकरणी पत्नीसह शालकाची पत्नी व अन्य एकाजणा विरूद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेपण पहा - न बोलताच जुळली मनं...दिव्यांग मुलीला बनविले जीवनसाथी 

पहूर पाळधी (ता.जामनेर) येथे संतोष नारायण कुमावत हे एकटे राहतात. गेल्या तीन वर्षांपासून पत्नी दीपाली व नऊ वर्षांचा मुलगा हिंमाशू हे हरिविठ्ठलनगरात भाड्याची खोली करुन राहतात. मुलगा व पत्नीला भेटण्यासाठी संतोष हे अधून- मधून हरिविठ्ठलनगरात येत असतात. त्यानुसार संतोष कुमावत हे आज (ता.28) दुपारी सव्वातीच्या सुमारास मुलाची भेट घेण्यासाठी गावावरुन हरिविठ्ठलनगरात आले. यावेळी पत्नीसोबत तिच्या घरात शालक सदानंद रामलाल कुमावत, त्याची पत्नी वैशाली, पत्नीच्या ओळखीतील एक व्यक्ती असे चौघे जण होते. संतोष कुमावत हे घराबाहेरील ब्युटीपार्लर दुकानात बसून मुलाची वाट पहात होते. 

पाणी पिल्यानंतर पडले खाली 
मुलगा आल्यानंतर त्याची भेट घेत असतांना पत्नी दिपाली हिने संतोष यांना पिण्यासाठी पाणी आणले. पाणी कडवट लागत असल्याने कुमावत यांनी पत्नीला विचारणा केली. दीपाली हिने महापालिकेने पाण्यात टीसीलएल पावडर टाकलेली असल्यामुळे ते कडवट लागत असल्याचे सांगितले. यानंतर काही वेळाने संतोष कुमावत यांना मळमळ होवून चक्कर येवून ते पडले. रस्त्याने जाणाऱ्या एकाने त्यांना रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले. संतोष कुमावत यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर त्यांच्या जबाब नोंदविण्यात आला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon husband drink water poison mix wife home