आयआयटी'कडे कल; निकाल कमीच! 

धनश्री बागूल
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये दर्जेदार असे शिक्षण मिळत असल्याने या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी भारतातील लाखो विद्यार्थी हे प्रवेश पूर्व अर्थात जेईई मेन व जेईई ऍडव्हान्स परीक्षा देत असतात. यात शहरातील 80 टक्के विद्यार्थी जेईई मेन परीक्षेला सामोरे जातात. त्यापैकी 20 टक्के जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरतात तर प्रवेशासाठी मात्र पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरत असल्याचे वास्तवही नाकारता येणार नाही, अशी स्थिती आहे. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) या अभियांत्रिकी शिक्षणात अग्रगण्य असलेल्या सरकारी केंद्रीय शिक्षणसंस्थेत "शिकणे' सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी महाग आहे. कारण आयआयटीत वार्षिक शुल्क हे तब्बल दीड लाखांहून अधिक आहे. आयआयटीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरवातीला "जेईई मेन' ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेसाठी शहरात पंधराहून अधिक क्‍लासेस असून यात एका विषयाची फी ही वीस ते पंचवीस हजार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला सुमारे 70 ते 80 हजार रुपये हे क्‍लासच्या फीसाठी भरावे लागतात. जे विद्यार्थी मेन परीक्षा उत्तीर्ण होतात ते जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र होतात. त्यामुळे आयआयटीचा खर्च हा लाखांवर असल्याने विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. 
 
लाखोंची उलाढाल 
आयआयटी व इतर एनआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक असल्याने सर्वाधिक विद्यार्थी हे फक्त मेनची परीक्षा देतात. तर काही मोजके विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्ससाठी प्रयत्न करतात. त्यामुळे दरवर्षी शहरात क्‍लासेसच्या माध्यमातून फक्त मेन परीक्षेसाठी लाखोंची उलाढाल ही होत असते. 
 
ट्युटोरिअलची मदत 
जेईई मेन परीक्षेच्या क्‍लासेसची फी अधिक असल्याने काही विद्यार्थ्यांना ती परवडत नाही. त्यातच बारावीनंतर अनेक क्‍लासेस लावले असल्याने सर्वच क्‍लासला जाणे देखील अशक्‍य असते. त्यामुळे काही विद्यार्थी हे कमी खर्चात ट्युटोरिअल विकत घेत असतात. 
 
जेईई मेन देणारे विद्यार्थी : 80 टक्के 
जेईई ऍडव्हान्स देणारे विद्यार्थी : 20 टक्के 
शहरातील क्‍लासेस : 15 ते 16 
तीन विषयांची फी : 70 ते 80 हजार 
वार्षिक उलाढाल : 80 लाखांहून अधिक 

आयआयटीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जरी कमी असली तरी "जेईई मेन' परीक्षा देणारे विद्यार्थी हे अधिक आहे. यात काही मोजकेच विद्यार्थी हे ऍडव्हान्सचा अभ्यास करतात. त्यासाठी बाहेरील राज्यात शिकण्यासाठी जातात. 
- नंदलाल गादिया (संचालक, महावीर क्‍लासेस) 

Web Title: marathi news jalgaon IIT result