coronavirus : ऑस्ट्रेलियात भारतीय नागरिक सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

कोरोनामुळे अनेक देशातील भारतीय आपल्या मायदेशी परतत आहे. ऑस्ट्रेलियात कोरोनाचे सुमारे चारशेपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मेलर्बनमधील सुमारे 30 ते 40 नागरिक असून स्थानिक प्रशासनाकडून त्यांची काळजी घेतली जात असल्याची माहिती श्री. बिरारी यांनी दिली.

जळगाव  : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून, त्याचा परिणाम जनजीवनावर होताना दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियातील मेलर्बन शहरात नोकरीसाठी स्थायिक असलेले नागरिक सुरक्षित असून, त्याठिकाणी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मेलर्बनचे प्रशासन सज्ज असल्याची माहिती तेथे स्थायिक असलेले पातोंडा (ता. अमळनेर) येथील जितेंद्र बिरारी यांनी दिली. 

जिल्ह्यातील बहुतांश तरुण नोकरीसाठी व शिक्षणासाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. अशाच पातोंडा (ता. अमळनेर) येथील जितेंद्र बिरारी हा तरुण ऑस्ट्रेलियातील मेलर्बन येथे स्थायिक झाला आहे. संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे अनेक देशातील भारतीय आपल्या मायदेशी परतत आहे. ऑस्ट्रेलियात कोरोनाचे सुमारे चारशेपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मेलर्बनमधील सुमारे 30 ते 40 नागरिक असून स्थानिक प्रशासनाकडून त्यांची काळजी घेतली जात असल्याची माहिती श्री. बिरारी यांनी दिली.

नक्की वाचा :  coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी रेल्वेगाड्या रद्द
 

कोरोना "फ्ल्यू'सारखा असल्याची मानसिकता 
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने खबरदारी म्हणून नागरिकांकडून स्वत:ची काळजी घेतली जात आहे. याठिकाणी कोरोना हा "फ्ल्यू'सारखा असल्याची नागरिकांची मानसिकता आहे, असे बिरारी यांनी सांगितले. तसेच येथे जनजीवनावर कोरोना अत्यंत कमी प्रमाणात परिणाम झाला असून, भारतीय नागरिकांचे देखील याठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. 

जीवनावश्‍यक वस्तूंचा साठा 
मेलर्बनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांकडून सतर्कता बाळगली जात आहे. अनेक ठिकाणी नागरिक दोन तीन आठवडे पुरेल इतक्‍या जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करून त्याचा साठा करून ठेवत आहे. त्यामुळे भविष्यात इटली सारखी परिस्थिती देखील निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी नागरिक सज्ज आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे परंतु अद्याप याठिकाणाहून कोणीही भारतात परत आलेले नाही तसेच तशी परिस्थिती देखील याठिकाणी नसल्याचे श्री. बिरारी यांनी सांगितले. 

 आर्वजून पहा : कामगाराचा मुलगा बनला ‘टिकटॉक स्‍टार’... तब्बल...दिड लाख फॉलअर्स !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Indian citizens safe in Australia