कार्बाईड'ने पिकविलेले दहा टन आंबे जप्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

शीर्षक 
"कार्बाईड'ने पिकविलेले दहा टन आंबे जप्त 

शीर्षक 
"कार्बाईड'ने पिकविलेले दहा टन आंबे जप्त 

जळगाव:   महापालिका आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत आज कॅल्शिअम कार्बाईडने पिकविलेल्या दहा टन आंब्यांचा माल जप्त करण्यात आला. बळीरामपेठेतील एका गोदामात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. 
बळीरामपेठेतील ब्राह्मणसभेजवळील निर्माणाधीन इमारतीच्या तळघरात अकबर रऊफ खान (रा.नशिराबाद) यांनी आंबे पिकविण्यासाठी गोदाम भाड्याने घेतले आहे. त्याठिकाणी हा प्रकार सुरू असल्याचे पथकास दिसून आले. या छाप्यात गोदामात कॅल्शिअम कार्बाईडच्या पुड्याही आढळून आल्या. अन्न व औषध भेसळ अंतर्गत अकबर रऊफ खान याच्यावर कारवाई केली जाणार आहे. 

14-1 
एका दिवसात पिकतो आंबा 
आरोग्यास घातक असलेले रसायन कॅल्शिअम कार्बाईड यावर बंदी आहे. या रसायनाद्वारे दोन लिटरच्या विशिष्ट "स्प्रे'मध्ये पाण्यात रयासन मिक्‍स करून हे रसायन आंब्यांवर फवारले जाते, त्यातून एका दिवसात आंबे पिकवले जातात. दिवसभरात विकायचा तेवढा माल गोदामातून बाहेर नेला जात होता, असे आढळून आले. 

14-1 
आंब्यांचा जप्त माल केला नष्ट 
कारवाईत गोदामातून जवळपास दहा टन आंबे जप्त करण्यात आले. जवळपास दोन ट्रॅक्‍टर भरून निघालेला हा माल महापालिकेच्या पथकाने जप्त करून तो मनपाच्या घनकचरा प्रकल्पाजवळील जागेत मोठा खड्डा करून त्यात नष्ट केला आहे. मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी एस.व्ही.पांडे, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शहा, अनिल गुजर, आरोग्य निरीक्षक अशोक नेमाडे, एस.पी.अत्तरदे, एस.बी.बडगुजर आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. 

14-1 
इमारत मालकावर होणार कारवाई 
सुधाकर महाजन यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून तळघराचा आंबे पिकविण्यासाठी गोदाम म्हणून वापर होत होता. ही जागा महाजन यांनी आंबे विक्रेत्यास अनधिकृतपणे भाड्याने दिल्याचे निदर्शनास आले असून इमारत मालकावरही कारवाई करण्यात येणार आहे. 
------- 
(इन्फो...) 
कारवाईची आकडेवारी 
- आंबे जप्त ः 10 टन 
- जवळपास 2 ट्रॅक्‍टर भरले 
- जप्त मालाची किंमत ः 5 लाख 62 हजार, 500 रुपये 
................ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon japta