विभागप्रमुख "क्वारंटाइन...जिल्हा परिषदेतील काम ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

अधिकाऱ्याच्या संपर्कात आले? याची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत संपर्कातील काही विभागप्रमुखांना पूर्वीच "क्‍वारंटाइन' करण्यात आले. यात अधिकाऱ्याच्या दालनातील सर्व कर्मचारी स्टाफसह वाहनचालकालाही "क्‍वारंटाइन' करण्यात आले आहे.

जळगाव ः "कोरोना व्हायरस'च्या प्रादुर्भावातून आता उच्चभ्रू वस्तीतील नागरिक देखील सुटलेले नाहीत. यात जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला "कोरोना'ची लागण झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच "क्‍वारंटाईन' करण्यात आले आहे. यात काही विभागप्रमुखांचा देखील समावेश आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाजच आता ठप्प झाले आहे. 
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तपासणी अहवाल सोमवारी (ता. 11) रात्री प्राप्त झाला. त्यानंतर याबाबतची माहिती प्रशासनात पसरली. संबंधित अधिकाऱ्यास "क्‍वारंटाइन' करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

संपर्कातील अधिकारीही "क्‍वारंटाइन' 
जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी असल्याने प्रशासनातील विभागप्रमुखांचा त्यांच्याशी रोजचा संपर्क येत असतो. शिवाय, महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षरी घेण्यासाठीही विभागप्रमुख जात असतात. यामुळे गेल्या आठवडाभरात कितीजण या अधिकाऱ्याच्या संपर्कात आले? याची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत संपर्कातील काही विभागप्रमुखांना पूर्वीच "क्‍वारंटाइन' करण्यात आले. यात अधिकाऱ्याच्या दालनातील सर्व कर्मचारी स्टाफसह वाहनचालकालाही "क्‍वारंटाइन' करण्यात आले आहे. 

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष 
सर्वत्र "कोरोना व्हायरस' पसरत असताना जिल्हा परिषदेत मात्र गांभीर्य पाळले जात नव्हते. बहुतांश विभागांमध्ये कर्मचारी जवळ बसून गप्पा मारत होते. मुख्य म्हणजे तोंडाला मास्क किंवा रुमाल देखील बांधलेला नसायचा. म्हणजे सामान्य नागरिकांना आवाहन केले जात असताना प्रशासनातच याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत पाहावयास मिळत होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jilha parishad co corona positive offishal work stop