कादंबरीचे व्हाटसॲप गृपवर प्रकाशन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 एप्रिल 2020

जिल्हा परिषदेमधील साहित्यिक शिक्षक -शिक्षिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. आपल्या लेखनाचे आदान- प्रदान करून समूहातील ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन मिळून लेखन उत्तरोत्तर दर्जेदार व्हावे या उद्दिष्टाने गृपची बनविण्यात आला आहे.

जळगाव : ‘महात्मा ज्योतिबा साहित्य मंडळ' या व्हाट्सअप गृपवर वडगाव तालुका चोपडा येथील जि. प. शाळेचे पदवीधर शिक्षक चंदन पवार यांच्या ‘शिवछत्रपती‘ कादंबरीचे प्रकाशन काल (ता. २३) करण्यात आले. 
जळगाव जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी त्यांच्या दालनात कादंबरीचा प्रथम भाग व्हाटसॲप गृपवर फॉरवर्ड करून हे अनोखे प्रकाशन करण्यात आले. उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांनी शिवछत्रपतींच्या कादंबरीच्या पहिल्या प्रकरणाशी सुसंगत शिवरायांचे चित्र समूहावर फॉरवर्ड केले. चित्रकार मिलिंद विचारे, विजय लुल्हे, जळगाव तालुका गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सपकाळे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, दीपक पाटील, मिलिंद जंजाळे, राकेश पाटील उपस्थित होते. प्रकाशनानंतर शिक्षण सभापतींनी सामाजिक अंतर पाळण्याचे सुचित केले. चर्चेत सभापती पाटील यांनी खंत व्यक्त केली की," शिवरायांचा फक्त योद्धा .. रणणसंग्राम... सनावड्या एवढाच इतिहास विद्यार्थ्यांवर बिंबवला जातो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये व मूल्याधिष्ठित कार्ये दुर्लक्षित राहतात." महाराणी येसूबाईंचे व्यक्तिचित्र काढणारे पहिले शिवकालीन चित्रकार म्हणून मिलिंद विचारे यांचा परिचय श्री. लुल्हेंनी करून दिला. 

शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ 
जिल्हा परिषदेमधील साहित्यिक शिक्षक -शिक्षिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. आपल्या लेखनाचे आदान- प्रदान करून समूहातील ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन मिळून लेखन उत्तरोत्तर दर्जेदार व्हावे या उद्दिष्टाने गृपची बनविण्यात आला आहे. जिल्हा परिषद तरसोद शाळेचे उपशिक्षक कवी विजय लुल्हे यांनी हा गृप नुकताच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी स्थापन केला आहे. गृपसाठी उषा सोनार व कवयित्री ज्योती राणे 
यांचे सहकार्य लाभत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon kadmbari publication in whatsaap lockdown