कामावरुन काढून टाकल्याचा संताप ; सोबत कामकरणाऱ्यावर चाकुने हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

गेल्या पन्नास दिवसांपासुन देशभरात लॉकडाऊन लागू आहे, मोलमजुरी आणि नोकदारांच्या नोकऱ्या त्यामुळे गेल्या आहेत. नवे काम मिळण्याची कुठलीच आशा, अपेक्षा नतसांना वाहन चालकाला कामावरुन काढून टाकल्याने..सोबत कामकरणाऱ्या रामलाल याला जबाबदार असल्याचा गैरसमज होवुन त्यातून निलेश निंबाळकर याने सोबत कामकरणाऱ्या रामलालच्या पोटातच चाकु खुपसला. 

जळगाव :- सौखेडा शिवारातील बिबानगर परिसरात वास्तव्यास असलेले दोघेही एकाच कंपनीत वाहन चालक म्हणून कार्यरत होते, एकाला कामावरून कमी करण्यात आल्याने त्याचा राग मनात धरून त्याने आज सोबत काम करणाऱ्या तरुणाच्या पोटात धारदार सुरा खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एकिकडे लॉकडाऊन मुळे काम भेटत नसतांना कामावरुन काढून टाकल्याने निलेश याने रामलालवर चाकुने हल्ला चढवला. 

प्राप्त माहितीनुसार, जळगाव तालुक्‍यातील सौखेडा शिवारातील बिबा नगर येथे रामलाल एकनाथ सोनवणे (वय-38) हा कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. ते, पायोनियअर कंपनीत चालक म्हणून कार्यरत असून त्यांच्याच घरा जवळ राहणारा नीलेश पोपट निंबाळकर हा देखील सोबत काम करतो. नीलेशला कंपनीने अचानक कामावरून कमी केले असून सोमवारी रामलाल सोनवणे कामावरून पायी घराकडे जात असताना नीलेशचे वडील पोपट निंबाळकर यांनी त्याला थांबवत चौकशी केली. माझ्या मुलाला कामावरून का? काढून टाकले याची माहिती ते घेत असताना घरातून नीलेश बाहेर आला आणि रामलाल याला बघताच शिवीगाळ देण्यास सुरवात केली. कंबरेतून धारदार सुरा काढून त्याने रामलालच्या पोटात खुपसला. घडल्या प्रकाराने एकच धावपळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत रामलाल याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तालुका पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच त्यांनी धाव घेतली. आज जखमीचा लेखी जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येऊन नीलेश निंबाळकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार साहेबराव पाटील करीत आहेत. 

काम भेटत नतसांना 
गेल्या पन्नास दिवसांपासुन देशभरात लॉकडाऊन लागू आहे, मोलमजुरी आणि नोकदारांच्या नोकऱ्या त्यामुळे गेल्या आहेत. नवे काम मिळण्याची कुठलीच आशा, अपेक्षा नतसांना वाहन चालकाला कामावरुन काढून टाकल्याने..सोबत कामकरणाऱ्या रामलाल याला जबाबदार असल्याचा गैरसमज होवुन त्यातून निलेश निंबाळकर याने सोबत कामकरणाऱ्या रामलालच्या पोटातच चाकु खुपसला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Kidnapped young man fired from work

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: