चोर घरात शिरले.. गॅससिलेंडर आणि दुचाकी घेऊन पसार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

कुटुंबीय गच्चीवर झोपलेले असताना. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दाराचा कडीकोयंडा तोडून आत चोरी केली. घरातील कपाटातील आणि इतर सर्व साहित्याची उलथापालथ करून चोरट्‌यांच्या हातात काहीच लागले नाही. 

जळगाव : दिवसाचे प्रचंड तापमान आणि रात्री घरात उकाडा होत असल्याने लक्ष्मण नगरातील वाणी कुटुंबीय घराला कुलूप गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते.बंद घर पाहून रात्रीच चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील सर्व साहित्याची उलथापालथ करूनही मौल्यवान वस्तू दागिने,रोकड न मिळाल्याने चोरट्यांनी चक्क स्वयंपाक घरातील सिलिंडर आणि कंपाउंड मधे उभी दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

प्रेमनगर परिसरातील लक्ष्मण नगरात प्लॉट क्र.(08/ 1) येथे योगेश वामन वाणी (कामळस्कर ) (वय-48) पत्नी कांचन, मुलगा आदित्य, मुलगी समीक्षा अशा कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहे. त्यांचा फ्लॅट,जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सद्या प्रचंड उकाडा जाणवत असल्याने गच्चीवर मोकळ्या हवेत वाणी कुटुंबीय झोपायला जातात. नेहमी प्रमाणे शनिवार(ता.16) रोजी घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबीय गच्चीवर झोपलेले असताना. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दाराचा कडीकोयंडा तोडून आत चोरी केली. घरातील कपाटातील आणि इतर सर्व साहित्याची उलथापालथ करून चोरट्‌यांच्या हातात काहीच लागले नाही. 

गॅससिलेंडरसह दुचाकी लंपास 
संपूर्ण घर शोधूनही काहीच सापडले नाही, म्हणून चोरट्यांनी स्वयंपाक घरातील सिलिंडर आणि कंपाउंड मध्ये उभी असलेली दुचाकी (एम.एच. 19 ए.के. 6333) हॅण्डल लॉक तोडून सिलेंडरसह दुचाकी चोरून नेली. तर, योगेश वाणी यांचा मुलगा आदित्य याची मोपेड (एम.एच.19 ए.के.6333)चे हॅण्डल लॉक तोडण्याचा प्रयत्न करूनही तोडता न आल्याने ती सुरक्षित राहिली. योगेश वाणी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lock house thief jwellary not avalable but gas cilender bike robary