लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात याला मिळाली सशर्त सुट...पेट्रोलबाबत हा आहे निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

काही उद्योग, व्यवसायांना त्यात सूट देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. त्यानुसार 20 एप्रिलपासून काही उद्योग व व्यवहार काही अंशी सुरु करण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.

जळगाव : देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर राज्यातील स्थितीचा आढावा घेत काही उद्योग, व्यवसायांना त्यात सूट देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. त्यानुसार 20 एप्रिलपासून काही उद्योग व व्यवहार काही अंशी सुरु करण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. लॉकडाऊनची सक्ती शिथिल करताना या उद्योग, व्यवसायांना सशर्त अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आता अनेक उद्योग, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, आरोग्य सेवा, पतसंस्था, महामार्गावरील धाबे, गॅरेज, इलेक्‍ट्रीकची दुकानांना लॉकडाऊनमधून सूट देण्याचे आदेश काढले आहेत. 

गर्दी नको, मास्क अनिवार्य 
ज्यांना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे तेथे सर्वांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सचे (गर्दी नको) पालन व्हायला पाहिजे. जर ते होत नसेल तर पोलिस येऊन कारवाई करणार आहे. 

 
हे असणार सुरू.. 
* ग्रामीण भागातील उद्योग, कंपन्या, कार्यालये 
* कृषिविषयक सर्व कामे 
* हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्‍लिनीक्‍स, टेलिमेडिसीन 
* दवाखाने, केमिस्ट, औषधी दुकाने, वैद्यकीय साहित्य दुकाने 
* लॅबोरेटरीज रक्त, लघवी संकलन केंद्रे 
* औषध उत्पादन, संशोधन करणारे वैद्यकीय लॅब 
* पशुवैद्यकीय हॉस्पिटल, दवाखाने, लस पुरवठा व विक्री करणारी दुकाने 
* घरपोच वैद्यकीय सेवा देणारी खासगी दुकाने 
* वैद्यकीय उपकरणे, ऑक्‍सिजन, पॅकेजिंग मटेरिअल निर्माण करणाऱ्या संस्था 
* आरोग्य सेवा पुरविणाऱ्या केंद्राचे बांधकाम, ऍम्बूलन्स निर्माण करणारे 
* केबल सेवा 
* कोल्ड स्टोअरेज, वेअर हाउस, खासगी सुरक्षा सेवा 
* पर्यटक, व्यक्तींना राहण्यासाठी हॉटेल, लॉजिंग सेवा 
* हॉटेल/रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी, टेक अवे) 
* इलेक्‍ट्रीक ट्रान्सफॉर्मरची दुरुस्तीचे दुकाने 
* पशुसंवर्धनाशी संबंधित गोशाळा, पोल्ट्री फार्म, पशूखाद्यांशी संबंधित घट 
* रस्ते बांधणी, सिंचन प्रकल्प, एमआयडीसीची कामे 
* अत्याव्यशक मॉन्सून पूर्व कामे, रिन्यूएबल ऊर्जा प्रकल्पांची कामे 
* शासकीय कार्यालये.. 

प्रवास.. 
* चारचाकीमध्ये केवळ दोनच जणांना परवानगी 
* टॅक्‍सी, ऑटो रिक्षा, साईकल रिक्षा यांना परवानगी नाही 

हे असणार बंद.. 
* शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खासगी क्‍लासेस, सिनेमागृह, उद्याने, मॉल, सर्व धार्मिक स्थळे 
* सभा, मेळावे, यात्रा, उरुस, क्रीडा स्पर्धा, आठवडे बाजार, सांस्कृतिक कार्यक्रम 
* एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी 
* महानगरपालिका, पालिका, नगरपंचायती क्षेत्रातील उद्योग 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lockdown shop open collecter disission today